केवळ २ पदार्थांनी घरीच बनवा ‘फेस पॅक’, चेहरा ताबडतोब होईल चमकदार

केवळ २ पदार्थांनी घरीच बनवा ‘फेस पॅक’, चेहरा ताबडतोब होईल चमकदार

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  बेसन आणि दही हे दोन पदार्थ वापरून तयार केलेल्या फेस पॅकमुळे चेहरा तत्काळ उजळतो. तेलकट त्‍वचा, कोरडी त्‍वचा, पिंपल्‍स असले तरी हा फेसपॅक सूट होतो. एका बाऊलमध्‍ये २ चमचा दही घेऊन त्यामध्ये एक चमचा बेसन मिळवा. ही क्रिमी पेस्‍ट चेहरा व मानेवर लावा. १५ ते २० मिनिट ते तसेच ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्‍या. हे रोज लावावे. दिवसभरात कधीही लावू शकता. १५ दिवसांत चांगला परिणाम दिसून येतो.

हे आहेत फायदे –

१) या पॅकचा परिणाम ताबडतोब दिसून येतो.
२) दहीतील लॅक्‍टीक अ‍ॅसिड आणि गुड बॅक्‍टेरियामुळे चेहरा उजळतो.
३) क्‍लीजिंगही होते.
४) अतिरीक्‍त तेल नियंत्रणात राहते.
५) चेहरा मुलायम होतो.
६) इंफेक्‍शनपासूनही बचाव होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु