कमी रक्तदाब हा उच्च रक्तदाबापेक्षा घातक ! जाणून घ्या 4 कारणे आणि 5 उपाय, जाणून घ्या

कमी रक्तदाब हा उच्च रक्तदाबापेक्षा घातक ! जाणून घ्या 4 कारणे आणि 5 उपाय, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कमी रक्तदाब हा उच्च रक्तदाबापेक्षा घातक ठरू शकतो. यामुळे हृदयरोग, इंडोक्रोनिक डिसीज, आणि न्यूरोरॉजिकल डिसऑर्डरचा धोका वाढू शकतो. तसेच काही व्यक्तींचा रक्तदाब कमी झाल्याने मेंदूतील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. यामुळे कमी रक्तदाबाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. कमी रक्तदाबाची कारणे आणि लक्षणे आपण जाणून घेणार आहोत.

१. गरोदरपणा
अनेकदा गरोदरपणात काही महिलांना कमी रक्तदाबाची समस्या होते. हा त्रास झाल्यास वेळीच तपासणी करून घेतली पाहिजे. काही वेळा गरोदरपणात रक्तदाब कमी झाल्याने डिहायड्रेशन आणि पोषकतत्वांची कमतरता होऊ शकते.

२. हृदयरोग
रक्तप्रवाह व्यवस्थित न राहिल्याने काहींना हृदयरोगाची समस्या होऊ शकते. अशा स्थितीत प्रथम कमी रक्तदाबाचे निदान होणे जरूरी असते.

३. डिहायड्रेशन
शरीरात पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होण्याची समस्या होऊ शकते. ज्या व्यक्ती पाणी कमी पितात त्यांना ही समस्या होते. पाण्यासह अशा व्यक्तींनी अन्य द्रवपदार्थांचे सुद्धा सेवन केले पाहिजे.

४. पोषकतत्वांची कमतरता
शरीरात पोषकतत्वांची कमतरता निर्माण झाल्यास कमी रक्तदाबाची समस्या होऊ शकते. व्हिटॅमिन बी १२ आणि आयर्नच्या कमतरतेमुळे ही समस्या होते. यासाठी आरोग्यदायी आहार घेतला पाहिजे.

हे उपाय करा

१. मीठाचे सेवन करा
ज्या व्यक्ती मीठाचे कमी सेवन करतात त्यांच्यात त्यांना कमी रक्तदाबाची समस्या होऊ शकते. जर ही समस्या जाणवत असल्यास अधिक मीठ खाण्याची सवय करावी.

२. पाणी, द्रवपदार्थ
या समस्येपासून दूर राहण्यासाठी पाणी आणि अन्य द्रवपदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करावे.

३. बदाम पाणी
बदामाची पेस्ट तयार करून कोमट पाण्यातून घेतल्यास कमी रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो.

४. बीट
ज्यांना लो-ब्लड प्रेशरची समस्या आहे अशा लाकांनी रोज बीटचा ज्यूस घ्यावा.

५. ब्लॅक कॉफी
जेव्हा रक्तदाब कमी होत असेल अशावेळी ब्लॅक कॉफी घेतल्यास फायदा होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु