उन्हाळ्यात कलिंगडाप्रमाणेच ताडगोळेही शरीरास देतात थंडावा

उन्हाळ्यात कलिंगडाप्रमाणेच ताडगोळेही शरीरास देतात थंडावा

आरोग्यनामा ऑनलाइन- ताडगोळे हे नैसर्गिकरित्या शरीर थंड आहेत. ताडगोळ्यांच्या सेवनाने उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित राहते. तसेच तहानही भागते, तात्काळ ऊर्जाही निर्माण होते. ताडगोळ्यात सोडियम आणि पोटॅशिअम हे मिनरल्स असल्याने शरीरातील फ्ल्युड आणि इलेक्ट्रॉलाइटचीतापळी नियंत्रित राहते.

डिहायड्रेशन, थकवा यापासून आराम मिळतो. ताडगोळ्यांमुळे अनेक पोटाचे आजार, पचनसंबंधी समस्यांवरही आराम मिळतो. मलावरोधाची समस्या दूर होते, शौचास स्वच्छ होते. असिडीटी आणि पोटाच्या अल्सरपासूनही आराम मिळतो. उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होतो. तसेच त्वचेच्याही समस्या निर्माण होतात.

अशावेळी ताडगोळ्याचे सेवन करावे. त्वचेवर ताडगोळा लावल्यासही आराम मिळतो. ताडगोळा हे कमी कॅलरीयुक्त फळ असून यातील मुबलक पाण्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे जास्त खाणे होत नाही आणि वजन कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु