हसण्याप्रमाणेच रडणेदेखील आहे लाभदायक, जाणून घ्या ‘हे’ ६ फायदे

हसण्याप्रमाणेच रडणेदेखील आहे लाभदायक, जाणून घ्या ‘हे’ ६ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन – हास्य हे आरोग्यासाठी खुप आवश्यक असते. यामुळे विविध ठिकाणी सकाळी-सकाळी अनेकजण सामुहिक हास्ययोग करताना दिसतात. तज्ज्ञदेखील हासण्याचा सल्ला अनेकदा देतात. परंतु, आरोग्यासाठी हास्य जसे फायदेशीर आहे, त्याप्रमाणेच कधी कधी रडणेही लाभदायक आहे, असे एका संशोधनात आढळून आले आहे. रडण्याचे ६ फायदे जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

१ रडण्यामुळे मेंदू, हृदय योग्य पद्धतीने काम करते.

२ मनातील निराशा बाहेर पडल्याने मन स्वच्छ होते.

३ भावनात्मक आश्रुंमुळे एल्बुमिन प्रोटीनची मात्रा २४ टक्के अधिक होते. यामुळे चयापचय चांगले होते.

४ डोळ्यांमध्ये मेमब्रेन सुकल्यास डोळ्यांची नजर कमजोर होते. हे मेमब्रेन अश्रू सुकू देत नाहीत. त्यामुळे नजर कायम राहते.

५ अश्रूंमधील लेसोजोम नावाचे तत्व बाहेरील बॅक्टेरियांना मारण्यासाठी उपयुक्त असते.

६ तणावात असताना रडल्यास अश्रूंसह अ‍ॅड्रो नॉकॉर्टिकोट्रॉपिक आणि ल्युसीनसारखे हार्मोन्स बाहेर पडतात. यामुळे तणाव दूर होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु