असा द्या ‘डिप्रेशन’ शी लढा,’या’ ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा, जाणून घ्या

असा द्या ‘डिप्रेशन’ शी लढा,’या’ ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डिप्रेशन या आजारामुळे जगभरात आतापर्यंत असंख्य लोकांनी मृत्यूला कवटाळले आहे. हा अतिशय गंभीर असा विषय असून डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी सर्वांनी वेळीच खबरदारी घेतली पाहिजे. याची लक्षणे दिसून आल्यास वेळीच उपाय केले पाहिजेत. डिप्रेशनची समस्या असल्यास तिच्याशी दोन हात कसे करावेत, कोणती खबरदारी घ्यावी, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

१) सकारात्मक दृष्टीकोनातून
पूर्णत: निराश आणि हताश झालेला व्यक्ती जगाकडे संशयाने पाहतो. त्यास सर्व गोष्टी निरर्थक वाटतात. यासाठी जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा, आत्मविश्वास कायम ठेवा.

२) स्वत:वर प्रेम करा
या आजारात माणूस स्वत:वर प्रेम करण्यास विसरतो. जो स्वत:वर प्रेम करु शकत नाही, तो स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही. यासाठी स्वत:वर प्रेम करा. आवडीचे काहीही करा. यातून संतुष्टता आणि आनंद मिळेल.

३) नेहमी हसत रहा
डिप्रेशनमुळे माणूस निराशेच्या अंधारात हरवून जातो. यातून बाहेर पडण्यासाठी हसणे खूप गरजेचे असते.

४) आत्महत्या हा चूकीचा मार्ग
स्वत:ला संपवून सर्व समस्या सुटतील, असा विचार करणे खूप चुकीचे आहे. असा विचार केल्याने स्वत:ला सामान्य करण्यासाठीची शेवटची संधीदेखील गमवून बसाल.

५) निसंकोच मदत मागा
डिप्रेशनच्या वेळी मदत मागण्यात संकोच बाळगू नका. सोशल मीडियाचा किंवा इतर माध्यमाचा आधार घेऊन आपण अशा लोकांच्या संपर्कात येऊ शकता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु