महिलांनी ‘या’ खास दिवसांमध्ये खाऊ नये पपई, कारण जाणून घ्या

महिलांनी ‘या’ खास दिवसांमध्ये खाऊ नये पपई, कारण जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पपईमध्ये भरपूर पोषक तत्त्व असतात. पपईत ए, बी, डी जीवनसत्वे, कॅल्शियम, प्रोटीन इत्यादी तत्त्व भरपूर असतात.  कारण यामध्ये असलेले ‘पेपिन्स’ नावाचे तत्त्व अन्न पचवण्यात मदत करते. हे फळ पोटासाठी खूप चांगले असून ते व्हिटॅमिन ए चा उत्तम स्रोत आहे.  मात्र, काही खास दिवसात महिलांनी पपई खाऊ नये, असे तज्ज्ञ सांगतात.

विविध आजारांवर गुणकारी-

पपईच्या पानांची भाजी ही उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त असते.
पपईमुळे वीर्य वाढते.
त्वचेचे रोग दूर होतात.
तसेच जखम लवकर भरून येते.
करपट ढेकर येत असतील तर पईचा रस गुणकारी आहे.
कच्च्या पपईची भाजी करून खाणे पोटासाठी उत्तम असते.
पिकलेली पपई खाल्ल्यास पचनशक्ती वाढते.

गरोदर महिलांनी खाऊ नये-

गरोदर असलेल्या महिलांनी पपई खाऊ नये. एका संशोधनानुसार पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना त्याचा त्रास होतो. पपईमध्ये लॅटेक्सचे प्रमाण जास्त असल्याने गर्भाशयामध्ये संकुचन होते. यामुळे गर्भपात होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु