महिला गर्भावस्थेत असताना गर्भातील बाळ का लाथ मारतं, जाणून घ्या

महिला गर्भावस्थेत असताना गर्भातील बाळ का लाथ मारतं, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गर्भावस्थेत असताना महिलांना अनेक अनुभव येत असतात. याच अवस्थेत असताना चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात पोटातील गर्भ लाभ मारायला लागतो. हा अनुभव महिलांसाठी खूपच सुखद असतो. यामुळे आपला बाळ हा निरोगी आहे याचे संदेश त्यांना मिळत असते. यामध्ये बाळ कोणत्या पद्धतीने लाभ मारतो, कितींदा लाथ मारतो अशा प्रकारचे अनेक प्रश्न महिलांच्या मनात असतात.

गर्भात बाळ लाथ मारणे हे त्याचे निरोगी असण्याचे संकेत असतात. बाळ निरोगी असल्यास गर्भात त्याची काहीना काही कृती ही चालू असते. या व्यतिरिक्त  आजूबाजूच्या परिसरातील परिवर्तनावर देखील बाळ लगेच प्रतिक्रिया देतो, विशेष करून जेव्हा बाळ बाहेरील आवाज ऐकतो तेव्हा जास्त प्रतिसाद देतो . जर गर्भातील बाळाचे लाथ हे सामान्य रूपापेक्षा कमी होत असेल तर यावरून कळते की बाळाला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. अशा वेळी हे चिंतेचे कारण असू शकते.

महिला जेव्हा डाव्या कुशीवर झोपते तेव्हा गर्भातील बाळाचे लाथ मारण्याच्या  प्रमाण वाढते. कारण जेव्ह महिला डाव्या कुशीवर झोपते तेव्हा बाळाला रक्ताची अपूर्तता होते म्हणून गर्भातील बाळाची हालचाल वाढते. गर्भवती महिल्यांच्या मते जेवणानंतर बाळ जास्त प्रमाणात लाथ मारायला लागतो. यामुळे हे कळते की बाळ ही आता आवशक्य अन्नपदार्थं ग्रहण करत आहे.

नऊ महिन्यानंतरच गर्भातील बाळ लाथ मारायला सुरुवात करतो. ज्या महिला दुसऱ्यांदा आई होत असतात अशा महिलांमध्ये १३ आठ्वड्यानीच गर्भातील बाळ लाथ मारायला सुरुवात करतो. ३६ आठवड्यानंतर गर्भातील बाळ लाभ मारायचे प्रमाण कमी होते. कारण एक वेळ अशी येते जेव्हा बाळ गर्भात ४० ते ५० मिनिट आराम करत असतो. गर्भावस्थेत असताना ३६ आठवडयांनी बाळाचे आकार वाढते ज्यामुळे बाळ जास्त हालचाल नाही करू शकत. अशावेळी ही बाळाचे लाथ  मारणे कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु