दीर्घायुष्य आणि चिरतारुण्यासाठी करा ‘या’ प्राचीन उपायांचा अवलंब, जाणून घ्या

 
दीर्घायुष्य आणि चिरतारुण्यासाठी करा ‘या’ प्राचीन उपायांचा अवलंब, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तारूण्य दीर्घकाळ टिकावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. तारूण्य अखेरपर्यंत टिकत नसले तरी तारूण्याचा कालावधी वाढविण्याचे अनेक उपाय आहेत. प्राचीन काळापासून असे उपाय केले जात आहेत. आहाराकडे आणि दिनचर्येकडे लक्ष दिल्याशिवाय तरुण राहणे केवळ अशक्य आहे. नेहमी तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी योग्य दिनचर्या आणि सकस आहार खूप महत्वाचा आहे. नेहमी तरुण राहण्यासाठी काही खास आयुर्वेदिक उपाय असून ते आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा

* अमृतावर्ण रस, वसंतकुमार रसाचा उपयोग २५० मिलीग्रॅम मात्रेमध्ये दिवसातून एकदा मधासोबत करावा. आयुर्वेदानुसार या मिश्रणाचे सेवन चाळीशीमध्ये अवश्य करावे, कारण व्यक्तीच्या या अवस्थेमध्ये शरीरातील धातूंचा विकास पूर्णपणे झालेला असतो.

* त्रिफळा चुर्णाचे सेवन केल्याने पोटातील कृमीची समस्या नष्ट होते. खरुज किंवा बद्धकोष्ठता झाल्यास त्रिफळा रामबाण उपाय आहे. त्रिफळा, शरीरातील रक्त कोशिका वाढवते, ज्यामुळे इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते. एका संशोधनानुसार त्रिफळा औषधीने कॅन्सरवर उपचार शक्य आहे. यामध्ये अँटी-कॅन्सर तत्त्व आढळून आले आहेत.

* प्रत्येक व्यक्तीने दररोज कमीतकमी सहा तासांची झोप घेणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. शक्य असल्यास जंक फूड आणि नॉनवेजपासून दूर राहावे.

* व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ खाल्ल्यास म्हातारपण लवकर येत नाही.

* भृंगराज चूर्ण १०० ग्रॅम, आवळा चूर्ण ५० ग्रॅम, तीळ ५० ग्रॅम या तिघांमध्ये गुळ मिसळून दररोज १० ते १२ ग्रॅम याचे सेवन करावे. या मिश्रणाचे सेवन वृद्ध मनुष्यालाही तरुण करून शकते. रात्री गायीच्या दुधाचे सेवन करावे.

* रिकाम्या पोटी हरडा खावा. रात्री दुध अवश्य घ्यावे. दररोज हरतिका, आवळा आणि दुधाचे सेवन करावे. तारूण्य कायम राहील.

* सकाळी दुध, दुपारच्या जेवणात भाजी, डाळ, भाकरी किंवा पोळी अवश्य असावी. रात्री गायीचे दुध घ्यावे. च्यवनप्राश अवश्य खावे. दिवसभर जास्त पाणी प्यावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु