‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि पोटाच्या तक्रारी दूर करा, जाणून घ्या

‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि पोटाच्या तक्रारी दूर करा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, चुकीच्या सवयी, यामुळे पोटाच्या तक्रारींची समस्या अलिकडे खुप वाढल्याचे दिसून येते. जवळपास सर्वच वयोगटातील व्यक्तींना हा त्रास होतो. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर सुद्धा होऊ शकते. कारण बहुतांश आजार हे पोटाच्या तक्रारीपासूनच सुरू होतात. म्हणून पोटाचे आरोग्य खुप महत्वाचे ठरते. पोटदुखी, पोट साफ न होणे, गॅस, अपचन, ढेकर या सामान्य समस्या असल्या तरी यावर वेळीच उपाय केले पाहिजेत. यासाठी घरगुती उपाय गुणकारी ठरू शकतात.

हे उपाय करा
१) पोटात गॅस झाला असेल तर कपभर पाण्यात एक लिंबू व अर्धा चमचा बेकिंग सोडा टाका. सोडा पूर्णपणे मिसळून हे पाणी प्या.
२) सकाळी व संध्याकाळी हर्बल टी घेतल्याने गॅस प्रॉब्लेम कमी होईल.
३) हळदीच्या पानांची पेस्ट करून ही पेस्ट दुधात मिसळून प्यायल्यास गॅसची समस्या दूर होते.
४) भरपूर पाणी पिल्याने पोटाशी संबंधित अनेक आजार दूर होऊ शकतात. दवसभरात कमीत कमी ६ ते ८ ग्लास पाणी प्या.
५) जेवणानंतर आल्याचा तुकडा खा. यामुळे पोटात गॅस तयार होत नाही. भाज्यांमध्ये आले टाकले तरी चालेल.
६) बटाट्याचा रस काढून जेवणापूर्वी घेतल्यास लवकर आराम वाटेल. दिवसातून दोन वेळा हा उपाय करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु