सांधे आणि गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी ‘हे’ १० घरगुती उपाय, जाणून घ्या

सांधे आणि गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी  ‘हे’ १० घरगुती उपाय, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – चेहरा, हात, पाय असे शरीराचे काही भाग काळवंडू नये, म्हणून नेहमीच काळजी घेतली जाते. परंतु कोपर आणि गुडघ्याचा काळेपणा दूर करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. धुळ आणि घाण जमा झाल्याने येथील त्वचा काळी पडते. अशी त्वचा स्वच्छ करणे खुप अवघड असते. स्लीवलेस आणि तोकडे कपडे घातल्यावर हे अवयव उठून दिसतात. हा काळेपणा दुर करण्याचे काही घरगुती उपाय आपण जाणून घेवूयात.

साखर आणि ऑलिव ऑइल
साखर त्वचेस एक्सफोलिएट करण्याचे काम करते, तर ऑइल मॉश्चराईज ठेवण्याचे काम करते. साखर आणि ऑलिव ऑइल समान प्रमाणात घ्या आणि त्याची घट्ट पेस्ट बनवा. कोपर आणि गुडघ्यावर लावुन पाच मिनिट चांगली मसाज करा. काही वेळे नंतर साबन लावून पाण्याने धुवून घ्या.

लिंबू आणि मध
लिंबू नॅचरल ब्लीचचे काम करते, तर मध काळेपणा दुर करते. सलग आठवडाभर हे लावल्याने चांगला परिणाम होतो. एक चमचा लिंबूचा रस आणि एक चमचा मधाचे मिश्रण करा. काळ्या त्वचेवर लावून २० मिनिट राहू द्या. वाळल्यावर पाण्याने धुवून घ्या.

बेसन आणि लिंबू
बेसन त्वचेला आतून स्वच्छता करते आणि लिंबू ब्लीच करते आणि काळेपणा दुर करते. बेसनमध्ये लिंबूचा रस मिळवा. कोपर आणि गुडघ्यावर मसाज करुन लावा. काही आठवड्यानंतर त्वचेचा रंग उजळेल.

अ‍ॅलोवेरा जेल
अ‍ॅलोवेरा सन टॅन दूर करण्यासाठी फायदेशीर असते. सोबतच त्वचा शुष्क होत नाही, आणि ओलावा टिकवून ठेवते. अ‍ॅलोवेराच्या पानांतून त्याचा गर काढुन घ्या. हे जेल कोपर आणि गुडघ्यावर लावा. अर्धा तास राहु द्या. वाळल्यानंतर पाण्याने धुवून घ्या. आठवडाभरात फरक दिसून येईल.

दही आणि व्हिनेगर
दोन्ही समान प्रमाणात मिश्रण करुन लावल्याने काळेपणा दूर होतो. तसेच ओलावा टिकुन राहतो. दोन्हीचे मिश्रण काळ्या भागावर लावा, वाळु द्या. वाळल्यानंतर हळूहळू मालिश करुन पाण्याने धुवून घ्या.

ऑलिव ऑइल
ऑलिव ऑइव एजेंडच्या रुपात कार्य करते. हे त्वचेचा रंग उजवण्या सोबतच त्वचेला कोमल बनवते. त्वचेचा कोरडेपणा यामुळे दूर होतो. ऑलिव ऑइल कोपर आणि गुडघ्यांवर लावुन हलक्या हाताने मसाज करा. १० मिनिट राहू द्या.

कोको बटर आणि शिया बटर
या दोन्ही पदार्थांनी स्किन सॉफ्ट आणि चमकदार होते. काळेपणा दुर होतो. उपाय झोपण्याअगोदर कोको बटर आणि शिया बटरने कोपर आणि गुडघ्याची मालिश करा. हे रात्रभर राहु द्या आणि सकाळी पाण्याने धुवून घ्या.

हंगामी फळे वापरा
लिंबू, संत्रे, अंगूर आणि टोमॅटोसारख्या फळांचा वापर कोपर आणि गुडघा स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर आहे. या फळांना काळ्या त्वचेवर लावुन मसाज करा. वाळल्यानंतर पाण्याने धुवून घ्या.

बेकिंग सोडा
बेकिंग सोडा त्वचेला स्वच्छ करण्याबरोबरच काळेपणा दूर करते. हे दूधा सोबत लावल्याने जास्त फायदा होतो. एक चमचा बेकिंग सोडा दुधात मिसळा. ही पेस्ट कोरप आणि गुडघ्यावर लावा. ओल्या हातांना मसाज करुन पाण्याने धुवून घ्या.

हळद, मध आणि दूध
हळद आणि दूध ब्लीचिंगसाठी फायदेशीर असते. हे कोरडी त्वचा मॉश्चराईज करण्याचे काम करते. या तिन्ही पदार्थांना समान प्रमाणात घेऊन पेस्ट बनवा. कोपर आणि गुडघ्यावर लावा. हळद, दूध आणि मधाची पेस्ट बनवा. कोपर आणि गुडघ्यावर लावुन २० मिनिट ठेवा. ओल्या हातांना मसाज करताना ते पाण्याने धुवून घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु