रक्ताची कमतरता दूर करण्याचे ‘हे’ १२ प्रभावकारी घरगुती उपाय, जाणून घ्या

रक्ताची कमतरता दूर करण्याचे ‘हे’ १२ प्रभावकारी घरगुती उपाय, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – थकवा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी लक्षणे अ‍ॅनिमियाची आहेत. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते. रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास अ‍ॅनिमिया होण्याची शक्यता असते. अ‍ॅनिमियाच्या रुग्णामध्ये लोह तत्त्व, व्हिटॅमिन बी, फॉलिक अ‍ॅसिड कमी असते. यासाठी कोणते पदार्थ खाल्ल्यास रक्ताचे प्रमाण वाढते आणि अ‍ॅनिमिया दूर होतो, हे आपण जाणून घेवूयात.

हे उपाय करा

* दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप समप्रमाणात टाकून चहा तयार करून प्यावा. यामुळे रक्ताची कमतरता दूर होईल.

* सकाळी अंकुरित धान्याचे सेवन करावे.

* शितोपलादी चूर्ण ५० ग्रॅम, अश्वगंधा चूर्ण ५० ग्रॅम, शतावरी चूर्ण १० ग्रॅम, सिद्धमकरध्वज ५ ग्रॅम, लोहभस्म १० ग्रॅम, अष्टवर्ग चूर्ण २५ ग्रॅम, मध ३०० ग्रॅम. हे सर्व चूर्ण एकत्र करून सकाळ-संध्याकाळ ५ ते १० ग्रॅम घ्यावे. त्यानंतर दुध प्यावे.

* मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे. यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

* एक ग्लास सफरचंद ज्यूस नियमित घ्यावे. सफरचंद ज्यूसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा. या मिश्रणात लोह तत्त्व जास्त असते.

* २ चमचे तीळ २ तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. पाणी गळून तिळाची पेस्ट तयार करा. यामध्ये मध मिसळून दिवसातून दोन वेळेस हे मिश्रण खावे. शेंगदाणे आणि गुळ एकत्र चावून-चावून खा.

* दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करावे. सकाळी थोडावेळ सूर्यप्रकाशात बसा.

* चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करा.

* सोयाबीनचे सेवन केल्यास जास्त प्रमाणात आयर्न मिळते.

* बीटला अ‍ॅनिमियासाठी एक रामबाण उपाय मानले जाते. हे लोह तत्वपूर्ण फळ आहे.

* टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लायकोपिनचे प्रमाण आढळून येते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आयर्नला एब्जार्ब करण्याते काम करते.

* अ‍ॅनिमियाच्या रुग्णांनी सुक्या मेव्याचे सेवन करावे. सुक्या मेव्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण लवकर वाढते.

* पिस्ता सेवन केल्यास शरीराला भरपूर आयर्न मिळते.

* रोज अक्रोड खाल्यानेसुध्दा अ‍ॅनिमियाच्या लोकांना फायदा होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु