‘ही’ ५ फुले अतिशय गुणकारी, ‘या’ आजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या

‘ही’ ५ फुले अतिशय गुणकारी, ‘या’ आजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – फुलांचा रंग आणि सुगंध सर्वांनाच आवडतो. मात्र, याच रंगसुगंधात अनेक औषधी गुण दडलेले असतात, हे अनेकांना माहित नसते. फुलांपासून अत्तर बनवले जाते. विशेष म्हणजे फुले खाण्यासाठी सुध्दा वापरली जातात. काही फुले जेवणाला स्वादिष्ट बनवू शकतात. फुलांचा खाण्यात वापर केला जातो, मात्र तो अप्रत्यक्षरित्या असतो. कधी-कधी आपण फुले सलाडमध्ये वापरतो. याविषयीची माहिती आपण घेणार आहोत.

लॅव्हेंडरचे फुल
हे सुगंधी फुल आइसस्क्रिम आणि दह्यामध्ये वापरले जाते. याचा वापर अँटीसेप्टिक आणि केसांचा रुक्षपणासाठी सुद्धा केला जातो.

शेवंती
शेवंतीच्या फुलांचा चहामध्ये उपयोग केला जातो. शेवंतीच्या फुलांमध्ये अँटी ऑक्सिडेंट आणि मिनरल्सव्यतिरिक्त अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी-कार्सनोजोनिक गुण असतात.

जास्वंदीचे फुल
सलाडला गार्निश करण्यासाठी या फुलाचा वापर केला जातो. तसेच चहामध्येसुध्दा जास्वंदीचे फुल वापरले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-अ‍ॅक्सिडेंट असल्याने रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.

सफरचंद आणि संत्रीचे फुल
ही दोन्ही फुले सर्वात जास्त खाण्यासाठी वापरली जातात. यांच्या सेवनाने अनेक आजार बरे होतात. परंतु त्यांचा उपयोग कमी प्रमाणात केला पाहिजे.

गुलाब
विविध पदार्थांमध्ये गुलाबाचे फुल वापरले जाते. गुलाबाचा वापर सलाड, आइसस्क्रिम, मिठाई, गुलाब-जल, जॅम-जेली, शरबत आणि जेवणामध्ये केला जातो. हे फुल हृदयाचे आजार, कर्करोग आणि मधुमेहावर रामबाण औषध आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु