मेंदूच्या आजाराची ही ४ प्रमुख लक्षणं, जाणून घ्या

मेंदूच्या आजाराची ही ४  प्रमुख लक्षणं, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण सर्वांना काही सर्वसामान्य किंवा सर्वज्ञात असलेले आजार माहीतच असतात. पण असाही एक आजार आहे जो सहसा कुणाला माहित नसतो पण या आजाराची लक्षणे काय असतात आणि हा आजार किती धोकेदायक असतो हे तुम्हाला माहित असणे खूप गरजेचे आहे. तो म्हणजे मेंदूला आलेली सूज. तसे बघता हा आजार लहान मुले, वयोवृद्ध तसेच शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता गमावून बसलेल्यांना होतो.  जर तुम्हांलाही ही लक्षणे जाणवत असतील तर वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

ही आहेत मेंदूला आलेल्या सूजेची लक्षणे :

१) ताप येणे, जास्त प्रकाश सहन न होणे, डोकेदुखी.

२) गळ्याला आलेला जडपणा किंवा ताठरपणा यामुळे मेनिन्जायटिस चे चुकीचे निदानही होऊ शकते तसेच कफ होणे, सर्दी, खोकला, गोंधळने, हातांची किंवा इतर अवयवांची मंद हालचाल ही सर्वसामान्य लक्षणे आहेत

३) काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाला जास्त डोकेदुखी, मळमळ, उलटी, एखादा परिसर,रस्ता विसरणे थोडक्यात मेमरी लॉस होणे. तापटपणा इतकेच नव्हे तर माणूस कोमातही जाण्याची शक्यता असते.

४) आजारांना सामोरे जाण्यासाठीची ऊर्जा किंवा रोगप्रतिकारक शक्ती शरीरात न उरणे.

मेंदूला आलेली सूज काहीवेळेस जीवघेणीही ठरू शकते. म्हणून ही लक्षणे दिसल्यास लवकरात-लवकर इलाज करावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु