महिलांसाठी लसूण खाण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

महिलांसाठी लसूण खाण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लसूण हा एक औषधी पदार्थ म्हणून ओळखला जातो. लसूण अनेक आजारांवर मात करण्यास उपयुक्त आहे. कच्चा लसूण खाल्याने महिलांना याचा चांगला फायदा होतो. दिवसभराच्या कामामध्ये ऊर्जा मिळण्यासोबतच अनेक आजारांवर लसूण चांगला उपाय आहे. जाणून घ्या महिलांसाठी लसूण खाण्याचे फायदे :

– वजन कमी करण्यासाठी कच्च्या लसणाचे सेवन लाभदायक असते. ज्या महिलांना वजन वाढीची समस्या आहे त्यांनी लसणाचे सेवन अवश्य करावे.

– उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधी आजार असलेल्या महिलांनी रोज सकाळी कच्चा लसूण खावा. याचा शरीराला चांगला फायदा होतो.

– जर महिलांना मधुमेहाचा आजार असेल तर अशा महिलांसाठी लसूण फायदेमंद ठरतो.

– ज्या महिलांना पायात सूज येणे आणि नेहमी थकवा जाणवत असेल तर अशा महिलांनी रोज रात्री झोपताना लसूण खावे.

– यामध्ये असणाऱ्या ऍन्टी ऑक्सिडंटमूळे अल्‍जमाइरसारखे आजार दूर राहतात.

– लसणामध्ये असणाऱ्या ऍन्टी ऑक्सिडंटमूळे शरीरातील फ्री रेडिकल्सची संख्याही कमी होते . ज्यामुळे कॅन्सरसारखे आजार दूर होतात.

– लसूणच्या नियमित सेवनाने महिलांमधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत होते.

– नियमितपणे लसूणच्या सेवनाने चेहऱ्यावरील मुरूम आणि डाग ही कमी होण्यास मदत होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु