मक्याचे कणीस खाण्याच्या खास पद्धती, ‘हे’ फायदे होतील, जाणून घ्या

मक्याचे कणीस खाण्याच्या खास पद्धती, ‘हे’ फायदे होतील, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात मक्याची कणसे बाजारात मोठ्याप्रमाणात विक्रिसाठी येतात. या काळात ही पौष्टीक कणसे आवश्य खावीत. कारण हा एक परिपूर्ण आहार आहे. मक्याच्या दान्यांची भजी तसेच अनेक पदार्थ बनवता येतात. मक्याचे कणीस भाजून खाल्यास स्वादिष्ट लागते. मक्याचे वानस्पतीक नाव जिया मेज आहे. आजारी व्यक्ती, रक्त कमी असणे किंवा इतर समस्यांसाठी काही लोक मक्याचा भरपूर वापर करतात. मका खाण्याच्या काही पद्धती आणि फायदे जाणून घेवूयात.

कसे खावे, कोणते फायदे होतात

* मक्याचे दाने काढल्यानंतर उरलेल्या मक्याला जाळुन राख करा. आणि चिमुठभर राख मधासोबत मिसळून दिवसातून २-३ वेळा खा. खोकला दूर होतो. काही भागात या उपायाचा उपयोग हृदयरोग दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो. परंतु येथे मधाच्या जागी लोणी वापरले जाते.

* ४० ग्राम मका अर्धा लिटर पाण्यात उकडा आणि जेव्हा पाणी अर्धे होईल तेव्हा ते गाळुन प्या. यामुळे मुत्रपिंडाचे रोग दूर होतात.

* ताज्या मक्याच्या कणसांना पाण्यात उकळा. यानंतर पाणी गाळुन यामध्ये मिश्री मिसळून प्यायल्याने मूत्रविसर्जनाची आग आणि मुत्रपिंडाचा कमकुवतपणा दूर होतो.

* टीबीचा रोग दूर करण्यासाठी रुग्णाला मक्याची भाकरी खाऊ घातल्याने फायदा होतो. ताप उतरल्यानंतर रुग्णाला अशक्तपणा जाणवतो, अशावेळी मक्का अवश्य खाऊ घालावा. मका एक पूर्ण आहाराप्रमाणे काम करते आणि शरीराला ऊर्जा प्रदान करते.

* मक्याचे दाने उकडून खाल्ल्याने पोट मजबूत होते. हे रक्त वाढवण्याचे काम करते. रक्ताची कमतरता असल्यास महिन्यातून एकदा तरी कणीस उकडून खावे.

* मक्याचे कणीस जाळून त्याची राख तयार करा. यानंतर हे बारीक करुन त्यामध्ये चवीसाठी काळे मीठ टाका. हे दिवसातून एक चमचा खाल्ल्याने खोकला, कफ आणि सर्दी बरी होते.

* कणीस स्वच्छ करुन पिण्याच्या पाण्यात उकडून घ्या. मका उकडल्यानंतर हे पाणी एक ग्लासमध्ये घ्यावे. यामध्ये मध टाका. अगोदर मक्याचे दाने चावा आणि नंतरच हे पाणी प्या. हे किडनी आणि मूत्रतंत्रला चांगले बनवते. किडनीच्या स्वच्छतेसाठी हा उत्तम उपाय आहे. यामुळे मुतखडा होण्याची शक्यता कमी होते.

* मक्याचे २० ग्राम दाने कुस्करुन एक ग्लास पाण्यात उकळावेत. पाणी अर्धे होईल तेव्हा यामध्ये एक चमचा मध टाका. हे मिश्रण दिवसातुन दोन वेळा लहान मुलांना प्यायला दिल्याने ते अंथरुण ओले करणार नाहीत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु