‘सौंदर्य’वृध्दीसह ‘या’ 5 समस्यांवर दुध ‘गुणकारी’, जाणून घ्या सोपे उपाय

‘सौंदर्य’वृध्दीसह ‘या’ 5 समस्यांवर दुध ‘गुणकारी’, जाणून घ्या सोपे उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दुध आरोग्यासाठी लाभदायक आहे, हे सर्वजण जाणतात. परंतु, दुधाचे असेही काही उपाय आहेत, जे आपल्याला माहित नाहीत. दुध हे शरीरात ताकद, उर्जा निर्माण करते, म्हणून त्यास पूर्णांन्न म्हणतात. दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी -२, व्हिटॅमिन ए, डी, के आणि इ, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, आयोडीन आणि विविध खनिज तत्व असतात. पौष्टिक असलेले दुध सौंदर्यवृद्धीसह इतर शारीरीक समस्यांवर गुणकारी आहे. दुधाचे हे उपाय आपण जाणून घेणार आहोत.

सौंदर्यवृद्धी : त्वचा सुंदर, तजेलदार करण्यासाठी दुधामध्ये थोडेसे मीठ टाकून चेहऱ्यावर सकाळ-संध्याकाळ लावावे. हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील डाग नष्ट होतात. शिवाय त्वचा सुंदर होते. निरोगी त्वचेसाठी कच्च्या दुधामध्ये गुलाबपाणी मिसळून हे दूध त्वचेला लावावे. ओठ काळवंडलेले असतील तर ओठांवर कच्चे दुध लावावे. या उपायाने ओठ गुलाबी होतात.

डोळ्यांच्या व्याधी : लोणी काढलेल्या कच्च्या दुधाचे काही थेंब डोळ्यात टाकल्यास डोळ्यांच्या अनेक व्याधी दूर होतात. तसेच या उपायाने कमी वयात चष्मा लागणे किंवा डोळ्यातून पाणी येणे या समस्या दूर होतात. परंतु, डोळ्यांची व्यवस्थित निगा राखण्यासाठी सकाळ-संध्याकाळ पाण्याने डोळे स्वच्छ करावेत.

स्मरणशक्ती : स्मरणशक्ती वाढविण्यासाठी दुध एक रामबाण औषध आहे. दररोज एक ग्लास दुधात विलायची टाकून दुध घ्यावे. दुधाचा स्मरणशक्तीवर सकारात्मक प्रभाव पडतो, असे तज्ज्ञ सांगतात.

तोंड येणे : दिवसातून तीन वेळा कच्च्या दुधाने गुळण्या केल्यास तोंड येण्याची समस्या बंद होते. अपचन, शरीरातील उष्णता वाढल्यास तोंड येते. या समस्येवर कच्चे दुध गुणकारी आहे.

पोटाचे आजार : पोट फुगणे, गॅस, जळजळ, अपचन, पोटदुखी असे त्रास असल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुध प्यावे. यामुळे पोटाचे आजार दूर होतात.

दुधाचा वापर असा करू नका

* दुधात गूळ मिसळून कधीही पिऊ नये. यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता असते.
* उडदाच्या डाळीसोबत दुधाचे सेवन करू नका. यामुळे आरोग्य बिघडू शकते.
* दुध जास्त गरम केल्याने त्यातील पोषक तत्वांचे प्रमाण कमी होते.
* फिके दुध पिणे अधिक लाभदायक असते. दुधात साखर मिसळल्याने शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. कफाचे प्रमाण वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु