हिंगात अनेक औषधी गुणधर्म, ‘हे’ २० रामबाण उपाय, जाणून घ्या

हिंगात अनेक औषधी गुणधर्म, ‘हे’ २० रामबाण उपाय, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पेरुला फोइटिडाया वनस्पतीच्या मुळाचा रस वाळवून हिंग तयार केला जातो. हे झाड २ ते ४ फुट उंच असते. इराण, अफगाणिस्तान, तुर्कीस्तान, बलुचिस्तान, काबुल आणि खुरासानच्या डोंगराळ भागात आढळणाऱ्या पेरुला फोइटिडाया वनस्पतीपासून हिंग तयार करण्यात येतो. या देशांमधून हिंग पंजाब आणि मुंबईमध्ये आयात केला जातो. मसाल्यातील महत्वाचा पदार्थ म्हणून हिंग ओळखला जातो. जेवणामध्ये हिंगाचा उपयोग प्राचीन काळापासून केला जात आहे. दररोजच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाची पूड महिला आवर्जून वापरतात. त्यामुळे प्रत्येक स्वयंपाक घरात हा पदार्थ असतो. हिंगाचा एवढाच उपयोग नसून तो एक औषधी पदार्थ सुद्धा आहे.

या आजारांवर गुणकारी
हिंग दम्याच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे. कफाचा नाश, पोटाच्या समस्या, अर्धांगवायूमध्ये हिंग लाभदायक आहे.

हिंगाचे औषधी उपयोग- 

* हिंग पाण्यात उकळून गुळण्या केल्यास दातांचे दुखणे कमी होते.

* सर्दीमुळे डोकं दुखत असल्यास पाण्यामध्ये हिंग मिसळून ते पाणी डोक्याला लावल्यास डोकेदुखी थांबते.

* हिंग पाण्यात मिसळून त्याचे काही थेंब नाकात टाकल्यास मायग्रेनच्या आजारात आराम मिळतो.

* लहान मुलांना निमोनिया झाल्यास हिंगाचे पाणी थोड्या-थोड्या प्रमाणात पाजावे.

* लो ब्लडप्रेशर आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते.

* त्वचाविकारांवरही हिंग गुणकारी आहे. ते पाण्यात भिजवून दाह होणाऱ्या भागावर लावल्यास आराम पडतो.

* मूळव्याधीवर हिंगाचा लेप लावल्यास लवकर आराम पडतो.

* बद्धकोष्ठता झाल्यास हिंगात थोडं मीठ आणि चिमूटभर सोडा टाकून रात्री झोपण्यापूर्वी सेवन करावे. पोट साफ होते.

* जेवणात हिंगाचा वापर केल्यास गर्भाशयाचे संकुचन होते. मासिक पाळीशी संबंधित समस्या दूर होतात.

* शरीरावर डाग असतील तर उसाच्या रसामध्ये थोडीशी हिंग पावडर मिसळून हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ डागांवर लावावे. डाग नष्ट होतात.

* जुन्या गुळामध्ये थोडेसे हिंग मिसळून खाल्ल्यास उचकी लगेच बंद होते.

* एखाद्या व्यक्तीने विष घेतले तर लगेच त्याला हिंगाचे पाणी पाजावे. हा उपाय केल्यास उलटीच्या स्वरुपात विष बाहेर पडते.

* भूक लागत नसल्यास जेवणापूर्वी तुपात घोळवलेलं हिंग, आल्याचा तुकडा लोण्याबरोबर खावा.

* सुंठ, काळे मिरे, ओवा, पांढरे जिरे, काळे जिरे, शुद्ध तुपात भाजलेला हिंग आणि काळे मीठ ही सर्व सामग्री एकत्र बारीक करून हे चूर्ण दिवसातून २ ते ४ ग्रॅम मात्रेमध्ये पाण्यासोबत घ्यावे. याच्या नियमित सेवनाने पोटातील गॅस समस्या दूर होते.

* हिंग पाण्यात मिसळून नाभीच्या जवळपास लावल्यास किंवा शुद्ध तुपात भाजलेला हिंग मधासोबत खाल्ल्यास पोटदुखी थांबते.

* हिंगाचा एक छोटासा तुकडा खावून त्यावर पाणी प्यायल्यास पोटदुखी थांबते.

* अर्धा लिटर पाण्यामध्ये २ ग्रॅम हिंग उकळावा. एक चतुर्थांश पाणी शिल्लक राहिल्यानंतर ते पाणी थंड करून प्यायल्यास पोटदुखी थांबते.

* हिंगाचे पाणी गुडघ्यांवर लावल्यास गुडघेदुखीचा त्रास कमी होतो.

* दात दुखत असल्यास हिंगाचा खडा त्या दातावर ठेवल्यास दुखणे थांबते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु