‘प्रेग्‍नंसी’ टाळण्याचे ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

‘प्रेग्‍नंसी’ टाळण्याचे ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकदा नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी महिलांकडून बर्थ कंट्रोल पिल्स घेतल्या जातात. परंतु याच्या जास्त सेवनाने आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे बर्थ कंट्रोलसाठी आपण काय घरगुती किंवा नैसर्गिक उपाय करू शकतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) फर्टिलिटी टेस्ट-  हे असं उपकरण आहे जे फर्टाइल दिवसांबद्दल माहिती देतं. हे उपकरण तुमच्या मूत्रातील ल्यूटिनिजिंग हार्मोनची माहिती देतं. मासिक पाळीच्या सुरुवातीला याची नोंद करायला हवी. सहाव्या दिवसापासून रोज सकाळी आधी मू्त्रातील ल्युटिनिजिंग हार्मोन रेकॉर्ड करायला हवं. हे उपकरण असेही सांगतं की, तुमचा फर्टाईल रेट कधी जास्त आणि कधी कमी असतो. परंतु हे उपकरण थोडं महाग आहे.

2) पपई- दीर्घकाळापासून गर्भधारणा रोखण्यासाठी पपईचा वापर केला जातो. हा एक परंपरागत उपाय आहे. पपईच्या बियांचा वापर शुक्राणूंना मारण्यासाठी केला जातो. त्यामुळे हेल्दी मेल शुक्राणूंची संख्या कमी होते.

3) कॅलेंडर बेस्ड मेथड- ज्यांची मासिक पाळी अनियमित असतात त्यांच्यासाठी ही मेथड उपयुक्त नाही. या मेथडमध्ये तुम्ही कॅलेंडरची मदत घेऊ शकता. मासिक पाळीनंतर 8 व्या दिवसापासून ते 19 व्या दिवसांपर्यंत महिला अधिक फर्टाईल होतात. ओव्यूलेशनपासून 7 दिवसआधी आणि त्याच्या 2 दिवसानंतर महिला गर्भवती राहण्याचे चान्सेस जास्त असतात.

4) पुल आउट मेथड- या मेथडमध्ये सेक्स करताना पुरुषाने स्खलित होण्यापूर्वीच आपले लिंग योनीच्या बाहेर काढायचे असते. ही मेथड माणसाच्या स्थिरता आणि आत्मनियंत्रणावर जास्त अवलंबून आहे.

5) कडुनिंब- कडुनिंबाची पाने नैसर्गिक बर्थ कंट्रोलसाठी उपयोगी ठरतात. कडुनिंबाचा रस, कडुनिंबाचे तेल या सगळ्याचा बर्थ कंट्रोल करण्यासाठी उपयोग केला जातो. कडुनिंबाचे तेल 30  सेकंदाआधी योनीतील शुक्राणू मारण्यात उपयोगी ठरतं. पुढील 5 तासांसाठी ते योनीत सक्रिय असतं. याचा ल्युब्रिकेंट म्हणूनही वापर होतो. याच्या वापराने जळजळदेखील होत नाही. 10 टक्के कडुनिंबाच्या तेलात पाणी मिक्स करून ल्युब्रिकेंट म्हणून वापरलं जाऊ शकतं. सेक्सपूर्वी हे तेल योनीच्या बाहेरील भागावरही तुम्ही लावू शकता. याशिवाय इम्प्लांटेशनला रोखण्यासाठी सेक्स नंतर तुम्ही हे तेल लावू शकता.

लक्षात ठेवा की वरीलपैकी कोणतीही पद्धत नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी 100% संरक्षण प्रदान करू शकत नाही. उच्च प्रजनन दिवसांमध्ये लैंगिक सेक्सपासून दूर राहणे हा एक चांगला मार्ग आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु