जाणून घ्या… केसर असली आहे की नकली ; अशी करा टेस्ट

जाणून घ्या… केसर असली आहे की नकली ; अशी करा टेस्ट

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – केसर हा मसाल्यातील सर्वात महाग पदार्थ आहे. शुद्ध केसरात उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असतात. केवळ खाद्यपदार्थांमध्ये नाही, तर औषधी म्हणून, सौंदर्य प्रसाधानांमध्येही केसराचा वापर केला जात असतो. उत्पादनाच्या अल्पतेमुळे केसर नेहमीच महाग असते. त्यामुळे त्यात कागदाचे बारीक तुकडे, गवत, मक्याच्या कणसाचे केस, प्राजक्ताच्या फुलांची देठे यांसारख्या पदार्थांची भेसळ केली जाते. जाणून घ्या केसर अस्सल आहे किंवा नाही हे कसे ओळखावे याबद्दल –

१) गंध व चवीवरून-
वासावरून केसर ओळखता येते. केसराचा सुगंध गोडसर असतो. तर केसरची चव अस्सल केसर चवीला काहीसे कडवट लागते. केसराची काडी जर चवीला कडवट लागली तर केसर अस्सल आहे असे ओळखावे.

जाणून घ्या… केसर असली आहे की नकली ; अशी करा टेस्ट

२) आकारावरून –
केसराचे तंतू एका टोकाला निमुळते तर दुसऱ्या टोकाला थोडे रुंद असते. त्यामुळे ते सहज ओळखले जातात. पाण्यात केसर टाकल्यास लगेचच ते तळाशी जाऊन बसते. असे केसर चांगल्या प्रतीचे समजले जाते. तर हलक्या प्रतीचे केसर पाण्यात तरंगते.

जाणून घ्या… केसर असली आहे की नकली ; अशी करा टेस्ट

२) रंगावरून –

i ) केशर हातावर चोळल्याने रंग अजिबात लागत नाही. नकली केसरचा रंग चोळल्यावर लगेचच हाताला लागतो.

ii ) केसराच्या दोन काड्या थोड्या पाण्यामध्ये टाकाव्यात. या काड्यांचा रंग त्वरित पाण्यामध्ये उतरू लागल्यास केसर नकली असल्याचे समजावे. अस्सल केसराचा रंग पाण्यामध्ये त्वरित उतरत नाही. तसेच हे पाणी जितके उकळले जाईल तितका अस्सल केसराचा रंग पाण्यामध्ये हळूहळू उतरतो.

iii) कपभर पाण्यामध्ये चिमुटभर बेकिंग पावडर मिसळावी आणि त्या पाण्यामध्ये केसराच्या दोन काड्या टाकाव्यात. जर पाण्याचा रंग गडद भगवा झाला तर केसर नकली आहे आणि खऱ्या केसराचा रंग बेकिंग पावडर मिश्रित पाण्यामध्ये पिवळा होतो.

जाणून घ्या… केसर असली आहे की नकली ; अशी करा टेस्ट

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु