‘या’ पानांचे चूर्ण लिव्हरचे आजार, डोकेदुखी, पोटदुखीत उपयोगी, जाणून घ्या

‘या’ पानांचे चूर्ण लिव्हरचे आजार, डोकेदुखी, पोटदुखीत उपयोगी, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जेवणाची चव वाढवणाऱ्या अनेक मसाल्यांच्या पदार्थांमध्ये औषधी गुणही आढळून येतात. मसाल्यातील औषधी गुणांचा उल्लेख आयुर्वेदामध्येही आहे. यापैकी एक औषधी गुणधर्म असलेला मसाल्याचा पदार्थ म्हणजे तमालपत्र होय. तमालपत्राची शेती प्रामुख्याने दक्षिण भारतात होते. याचे  स्ट्रॉ   नाव सिनॅमोमम तमाला असे आहे. तमालपत्राच्या औषधी गुणांची माहिती करून घेवूयात.

हे आहेत औषधी गुणधर्म

* तमालपत्राच्या तेलाने मालिश केल्यास डोकेदुखी, अर्धांगवायू आणि मांसपेशीच्या वेदनेत आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने मालिश केल्यास शांत झोप लागते आणि रक्तसंचार योग्य पद्धतीने होतो.

* मधासोबत तमालपत्राचे चूर्ण घेतल्यास सर्दी आणि खोकल्यात लवकर आराम मिळतो. तोंड आले असेल तर या मिश्रणाचे सेवन करू नये.

* तमालपत्रामध्ये कृमिनाशक गुण असतात. वाळलेल्या पानांचे चूर्ण तयार करून दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात २ ग्रॅम प्रमाणात घेतल्यास पोटातील जंत, कृमी शरीराबाहेर पडतात.

* पानांचे चूर्ण लघवीशी संबधित समस्यांमध्ये लाभदायक ठरते. दिवसातून दोन वेळेस २-२ ग्रॅम या चूर्णाचे सेवन जेवल्यानंतर केल्यास लघवीशी संबधित सर्व समस्या दूर होतील.

* तमालपत्र झाडाच्या सालीचे चूर्ण हृदयासाठी उत्तम मानले जाते. दररोज जेवणात तामालपत्राचा मसाला स्वरुपात उपयोग केल्यास हृदय रुग्णांना लाभ होतो.

* तणाव आणि उच्च रक्तदाबात दैनंदिन जेवणात तमालपत्राचा उपयोग अवश्य करावा. विविध पदार्थांमध्ये तमालपत्राचा उपयोग शरीरासाठी फायदेशीर मानला जातो. तांबे, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, झिंक यांचे विविध गुण यामध्ये असल्याने रक्तदाबावर नियंत्रणात राहतो.

* तमालपत्र झाडाच्या सालीचे २ ग्रॅम चूर्ण पाण्यामध्ये अर्धातास भिजवून ठेवावे. त्यानंतर हे चूर्ण खाल्ल्यास डायबिटीज रुग्णांना लाभ होतो. दिवसातून दोन वेळेस या चुर्णाचे सेवन केल्यास शरीरातील साखरेची मात्रा नियंत्रित होते. आधुनिक शोधामध्येही ही गोष्ट मान्य करण्यात आली आहे.

* तमालपत्र झाडाच्या सालीचे आणि पानांचे चूर्ण १-१ ग्रॅम समान प्रमाणात १५ दिवस नियमित घेतल्यास लिव्हर शी संबधित समस्या दूर होऊ शकतात.

* गॅसची समस्या किंवा पोटात दुखत असेल तर चिमुटभर तमालपत्र चूर्ण आणि जिरे घेतल्यास लवकर आराम मिळतो. पोटाशी संबंधित कोणत्याही समस्येवर हा उपचार केला जातो.

* नाक, तोंड, मल किंवा लघवीतून रक्त येण्याची समस्या असेल तर एक ग्लास थंड पाण्यात एक चमचा तमालपत्र चूर्ण मिसळून प्रत्येक तीन ते चार तासानंतर घेतल्यास रक्तस्राव बंद होतो

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु