‘या’ घरगुती उपायांनी काढून टाका नको असलेले केस, जाणून घ्या पद्धत

‘या’ घरगुती उपायांनी काढून टाका नको असलेले केस, जाणून घ्या पद्धत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरावरील नको असलेले केस घरच्या घरी उपास करून काढणे खुप सोपे असते. यासाठी काही खास उपाय असून यामुळे अनावश्यक केसांपासून सुटका होऊ शकते. हे करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय हा कायमस्वरूपी उपाय नाही. हे करण्यापूर्वी तज्ञाचा आवश्य घेतला पाहिजे. त्वचेमध्ये जळजळ होत असल्यास हा उपाय करू नका. उपाय केल्यानंतर आठवणीने मॉइश्चरायजर लावा.

हे आहेत उपाय

१) कुस्करलेली पपई आणि हळद पावडरची पेस्ट करून ती लावावी. ती सुकल्यानंतर हलक्या हाताने मालिश करून काढा.

२) दही, मलाई आणि मोहरीची पेस्ट बनवून नको असलेल्या केसांवर लावा. सुकल्यानंतर हळूहळू घासून काढा.

३) ब्राउन शुगर नको असलेल्या केसांची जागा ओली करून घासावी. काही दिवसांत केस कमी होतील.

४) डाळ, बटाटे, मध आणि लिंबाचा रस भिजवलेल्या डाळीमध्ये मिसळून पेस्ट बनवा. केसांच्या त्वचेवर ३० मिनिटे लावून ठेवा. नंतर घासून काढा.

५) हळद, बेसन आणि मध एकत्र करून घट्ट पेस्ट बनवून घ्या. ती केसांच्या ठिकाणी लावा. सुकल्यानंतर हलक्या हातांनी घासून काढा.

६) कोमट पाण्यात मीठ मिसळून कॉटनच्या कपड्याने बॉडीची मसाज करा. काही दिवसांतच केस कमी होतील.

७) कॉफीचे बी बारीक करून त्यामध्ये बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा. त्वचेवर लावून सुकू द्या. यानंतर हलक्या हाताने काढून घ्या.

८) कच्ची अंडी, कॉर्नफ्लोर आणि साखरेची घट्ट पेस्ट बनवून लावा. सुकल्यानंतर सेलोफेन किंवा कपड्याच्या पट्टीने केसांच्या विरुद्ध दिशेने ओढून काढा.

९) मध, लिंबीचा रस आणि साखरेची पेस्ट बनवून नको असलेल्या केसांवर लावा. सुकल्यानंतर हळूहळू केसांच्या विरुद्ध दिशेने काढा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु