योग्य प्रमाणात चहा घेतल्याचे ‘हे’ २० उपयोग जाणून घ्या, यामुळे प्रत्येकाला आवडेल हे पेय

योग्य प्रमाणात चहा घेतल्याचे ‘हे’ २० उपयोग जाणून घ्या, यामुळे प्रत्येकाला आवडेल हे पेय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतातील जवळपास सर्वच घरांमध्ये चहा हे पेय सेवन केले जाते. अगदी अपवादात्मक अशी कुटुंबे असतील जी चहा पीत नाहीत. चहाची परंपरा भारतात चांगलीच रूजली आहे. कोरा चहा आरोग्यासाठी चांगला आहे. चहामुळे उर्जा आणि स्फूर्ती मिळते. मात्र, चहाचे अरोग्यासह इतरही काही उपयोग आहेत. हे उपयोग खूपच कमी लोकांना माहित असावेत. हेच उपायोग आपण जाणून घेणार आहोत.

चहाचा इतिहास

भारतामध्ये सन १८१५ पासून आसाममधील स्थानीक लोक चहापासून एक पेय बनवून पित होते. भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड बँटिकन यांनी १८३४ मध्ये चहाची परंपरा सुरु करणे आणि याचे उत्पादन करण्याची शक्यता शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली. १८३५ मध्ये आसाममध्ये चहाचे बागिचे लावण्यात आले.

हे आहेत उपयोग

१ वेदना 
इंजेक्शन घेतल्यावर काहीवेळा वेदना होतात. अशावेळी टी-बॅग भीजवा आणि वेदनेच्या ठिकाणी ठेवा.

२ किडा चावणे 
एखादा किडा चावला तर चहाच्या पाण्यात कॉटन भिजवून वेदना त्या ठिकाणावर लावा, वेदना कमी होतील.

३ पायाची दुर्गंधी 
दिर्घकाळ बूट घातल्यामुळे पायांची दु्र्गंधी येते. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी चहाचे पाणी बनवून त्यामध्ये पाय बुडवून बसा.

४ माउत वॉश
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी पूदीन्याची चहा बनवू त्याने गुळणी करा. पुदीन्याची चहा तयार करण्यासाठी पाण्यात पुदीन्याची पाने टाकून उकळा. यानंतर गाळून उपयोग करा.

५ नैर्गिक टोनर 
टी-बॅग एका नॅचरल टोनरचे काम करते. टी-बॅग पाण्यात भिजवून नियमित लावल्यास चेहरा ग्लो करतो.

६ स्क्रब 
ग्रीन टीमध्ये थोडीशी साखर आणि पाणी टाकून मसाज करा. चेहरा उजळतो.

७ दातांची स्वच्छता
निरोगी आणि पांढरे दात ठेवण्यासाठी नियमित एक कप ग्रीन टी अवश्य प्या. हे दातांसाठी एक चांगल्या औषधीचे काम करते.

८ पोटदुखी 
पोटदूखी होत असेल तर दूधाच्या चहा ऐवजी ग्रीन-टीमध्ये थोडीशी अद्रक टाकून प्या.

९ अल्सरच्या रोग्यांसाठी
पोटात अल्सरमुळे वेदना होत असतील तर गार ग्रीन टी प्या. यामध्ये खुप अँटीऑक्सीडेंट्स असतात.

१० बध्दकोष्ठता 
पोट खराब झाले असेल तर गरम ग्रीन टीमध्ये दालचीनी पावडर आणि लिंबूचा रस टाकून प्या.

११ त्वचेचे व्रण 
चटका लागला तर टी-बॅग भीजवून त्याचे पाणी लावा. जळलेला व्रण राहणार नाही. जास्त भाजले असेल तर बाथ टबमध्ये टी-बॅग टाकून त्यामध्ये बसा. जळाल्याचे व्रण राहणार नाहीत.

१२ जळजळ
१ कप ग्रीन टीमध्ये २ चमचे पुदीना मिक्स करुन प्या, पोटाची जळजळ दूर होईल.

१३ पीरियडमधील वेदना 
पीरियडच्या काळात पोटात वेदना होत असल्यास ग्रीन टी प्या. यातील अँटीऑक्सीडेंट्स कोलोनला स्वच्छ करतात.

१४ गॅसची समस्या दूर
ग्रीन टीमध्ये पुदीना टाकून प्यायल्यास गॅसपासून सुटका मिळते.

१५ थकवा 
डोळ्यांचा थकवा आणि सूज दूर करण्यासाठी दोन टी-बॅगला कोमट पाण्यात काही वेळ ठेवा. यानंतर टी-बॅग डोळ्यांवर ठेवा. टी बॅग काही वेळ डोळ्यांवरच राहू द्या.

१६ पांढरे केस 
एक कप पाण्यात तीन टी बॅग्स टाका. या पाण्यात मेहेंदी टाका. रात्रभर हे मिश्रण तसेच राहू द्या. सकाळी ही पेस्ट केसांना लावा. एक तास तशीच ठेवून नंतर डोके धुवा, केसांवा डाय करण्याची गरज राहणार नाही.

१७ केसांचे कंडिशनिंग 
केसांच्या कंडिशनिंगसाठी दोन ग्लास पाण्यात चार टी-बॅग टाका. हे पाणी गार करुन घ्या. शाम्पू केल्यानंतर हे पाणी केसांवर टाका, केस शायनी आणि सिल्की होतील.

१८ दातदूखी 
एका बाउलमध्ये साधे पाणी घेऊन त्यामध्ये टी-बॅग भीजवा. ती टी-बॅग दुखत असलेल्या दातावर ठेवा. वेदनेपासून आराम मिळेल.

१९ फर्नीचर स्वच्छ करण्यासाठी
लाकडाचे फर्नीचर स्वच्छ करण्यासाठी थोड्या पाण्यात टी-बॅग टाकून उकळून घ्या. यानतंर या चहाच्या पाण्यात स्वच्छ कपडा बुडवून फर्नीचरची स्वच्छता करा. फर्नीचर चमकते.

२० काच स्वच्छ करण्यासाठी
काच स्वच्छ करण्यासाठी चहाचे पाणी बनवा. या पाण्याने काच स्वच्छ करा. काचेचे डाग दूर होतील आणि काच चमकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु