‘या’ कारणामुळे होतो मासिक पाळीच्या दरम्यान त्रास, जाणून घ्या

‘या’ कारणामुळे होतो मासिक पाळीच्या दरम्यान त्रास, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मासिक पाळी दरम्यान पोटा खालील भाग दुखणे साहजिक आहे. मासिक पाळीच्या आधीच हाथ, पाय आणि कंबर दुखण्यास सुरुवात होते. यावेळी कोणाला जास्त त्रास होतो तर कोणाला कमी त्रास. सगळ्यांचे त्रास हे एकसारखेच नसतात. मासिक पाळीच्या दरम्यान जर कमी त्रास होत असेल तर चिंतेची गोष्ट नसते.

पण जर का हा त्रास जास्त असेल तर मग यावर विचार करावा. काही महिलांना तर मासिक पाळीच्या दरम्यान इतका त्रास होतो की त्यांना औषध घेण्याची गरज भासते. जर तुम्हाला इतका त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष नका करू. जाणून घेऊ या दिवसात त्रास होण्यामागील करणे.

image.png

बऱ्याच वेळेला मासिक पाळी नियमित न आल्याने देखील हा त्रास होतो. या व्यतिरिक्त जर तुम्हाला जास्त रक्त स्त्राव होत असेल तरीही त्रास होऊ शकतो.

यावेळी गर्भाशयाचे मासपेशी आकसले जातात. ज्यामुळे त्यातील अस्वच्छ पदार्थ बाहेर टाकले जाते यामुळेही पोट दुखणे, कंबर दुखणे तर कधी कधी डोके दुखी, उल्टी होणे यासारखे त्रास होण्याची शक्यता असते.

मासिक पाळीच्या दरम्यान जास्त प्रमाणात फॅट असणाऱ्या पदार्थांचा सेवन करावा. शिवाय मॅग्नेशियम, जिंक आणि व्हिटॅमिन बी १ चा सेवन करावा. यामुळे यादरम्यान होणारा त्रास कमी होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु