‘व्हिटॅमिन बी १२’ च्या कमतरतेमुळे होतात ‘या’ ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या

‘व्हिटॅमिन बी १२’ च्या कमतरतेमुळे होतात ‘या’ ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शाकाहारी लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता जास्त असल्याचे एका सर्वेत आढळून आले आहे. शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास हात पायांना मुंग्या येणे, पायांमध्ये वेदना होणे, झोप न येणे, पचनक्रिया बिघडणे, अन्न पचन न होणे, स्मरणशक्तीवर परिणाम आदि समस्या होतात. हे व्हिटॅमिन शरीराला का आवश्यक असते, खुपच कमी झाल्यास कोणते परिणाम होतात, तसेच हे मिळवण्याचे उपाय कोणते, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

शरीरासाठी आवश्यक
* डीएनएच्या निर्मितीत उपयोगी असते.
* गरोदर महिलांना याची जास्त गरज असते.
* व्हिटॅमिन बी १२ रक्तपेशींना आधार देते.
* नसा निरोगी ठेवते.

जास्त कमतरता असल्यास
* झोप यायला खुप वेळ लागतो.
* हात-पाय बधीर होतात.
* उभे राहताना चक्कर येतात.
* डोळ्यांवर अंधारी येते.

हे असे वाढवा
* जास्त प्रमाणात दही खावे.
* डाळही खाऊ शकता.
* सप्लीमेंट्सच्या माध्यमातून याची कमतरता पुर्ण करता येते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु