हिवाळ्यातील आजारांपासून बचाव करतात ‘ही’ ३ योगासने, जाणून घ्या

हिवाळ्यातील आजारांपासून बचाव करतात ‘ही’ ३ योगासने, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हिवाळ्यात आजारांपासून बचाव करण्यासाठी योगा खुप लाभदायक आहे. थंड हवामानामुळे आपल्या शरीरातही काही बदल होत असतात. या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास आजार पडण्याची शक्यता असते. यासाठी नियमित योगा केला पाहिजे.

करा ही योगासने

नाडी शोधन प्राणायाम
Related image

प्रथम मांडी घालून बसावे. यानंतर दोन्ही हात जांघांवर ठेवा. डोळे बंद करा. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. आता डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वास सोडा. आता डाव्या नाकपुडीवरील अंगठा काढा. दोन्ही हात जांघांवर ठेवा. आता डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. नंतर हळूहळू श्वास सोडा. यामुळे दम्यापासून बचाव होतो. डोकेदुखी, मायग्रेन दूर होते.

कपालभाती
Image result for कपालभाती

पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. हात वरच्या दिशेने गुडघ्यांवर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना पोट आतल्या बाजूने ओढा. पोट आतमध्ये ओढताना ते पाठीच्या कण्याला स्पर्श झाले पाहिजे. क्षमतेनुसारच ही क्रिया करा. पोटाचे स्नायू सैल सोडल्यानंतर श्वास फुफ्फुसांमध्ये पोहोचतो. शरीरामधील विषाक्त पदार्थ यामुळे दूर होतात. तसेच हे आसन केल्याने शरीराची सक्रियतादेखील वाढते.

वज्रासन
हिवाळ्यातील आजारांपासून बचाव करतात ‘ही’ ३ योगासने, जाणून घ्या

सपाट आणि स्वच्छ जागेवर बसून गुडघे जमिनीवर टेकवा. हिप्स पायांवर असावी. पायांचे अंगठे एकमेकात अडकवून ठेवा. दोन्ही हात जांघांवर ठेवा. याच मुद्रेत शरीर शिथिल ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा. दीर्घ श्वास घ्या. ही प्रक्रिया पाच मिनिटे करा. यामुळे पोटदुखी, गॅस, मलावरोध आणि अ‍ॅसिडिटी इत्यादी पोटाचे विकार दूर होतात. संधिवातापासूनही आराम मिळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु