जाणून घ्या ६ चुकीच्या गोष्टींविषयी, ज्या आपण नकळत नेहमीच करतो

जाणून घ्या ६ चुकीच्या गोष्टींविषयी, ज्या आपण नकळत नेहमीच करतो

आरोग्यनामा ऑनलाइन – दिवभरात आपल्या हातून नकळत काही चूका होत असतात, या चूका आपल्या लक्षातही येत नसल्या तरी त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो. अनेक धोक्यांबाबत तर आपल्याला माहितही नसते. त्यामुळे या चूका आहेत, याबाबतच आपण अनभिज्ञ असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर स्किन टाईट जीन्सचे देता येईल. या चूका टाळण्यासाठी आपण त्या चूका जाणून घेणार आहोत.

या चूका कधीही करू नका

* टाइट जीन्समुळे नसांवर दाब पडतो. यामुळे पायांमध्ये येत असलेल्या हवेचा फ्लो कमी होतो. पायांमध्ये खाज आणि मुंग्या येतात. नंतर पाय सुन्न होऊ शकतात.

* जेवण केल्यानंतर तात्काळ ब्रश करु नका. जेवणाच्या कमीत कमी ३० मिनिटे किंवा एक तासानंतर ब्रश करावा. पदार्थ हायली अ‍ॅसिडिक असतील तेव्हा विशेष लक्ष द्यावे.

* शिंक आल्यावर ती कधीही थांबवण्याचा प्रयत्न करू नका. शरीरात काही हार्मफुल पार्टिकल्स जातात, त्यावेळी शिंक येते . अशा वेळी आपण शिंक थांबवली तर हे पार्टीकल शरीरातच राहतात.

* परफ्यूममध्ये सिंथेटिक तत्त्व असतात. यामुळे चक्कर येणे, मळमळणे किंवा झोप येण्यासारख्या समस्या होऊ शकतात.

* स्वस्त प्लास्टिक कंटेनरऐवजी ग्लास, स्टेनलेस स्टील किंवा सिरामिक मटेरियलच्या कंटेनरमध्ये खाद्यपदार्थ ठेवावेत. चांगल्या क्वालिटीचे प्लास्टिक वापरावे.

* त्वचेवर मोठ्या संख्येने बॅक्टेरिया असतात. ते आपल्या शरीराला संरक्षण देत असता. अँटीबॅक्टेरियल सोपचा खुप वापर केला तर हे हार्मफुल बॅक्टेरियांना शरीरात जाण्याची संधी देतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु