भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या

भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेक महिला कपाळाला कुंकू लावतात अथवा भांगेत भरतात. तसेच पुजाविधीमध्येही कुंकू वापरले जाते. हिंदू धर्मात कुंकूला खूप महत्त्व आहे. परंतु, कुंकूचा रंग लाल व्हावा म्हणून त्यात लीड मिसळले जाते. जे अतिशय घातक आहे. अमेरिकन ऑर्गनाइजेशन रुटगर्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या संशोधनात हे आढळून आले आहे. या संशोधनात अमेरिका आणि भारतातील वेगवेगळ्या दुकानातील कुंकूचे सुमारे ११८ नमुने तपासले असता ८० टक्के नमुण्यांमध्ये लीडचे अंश आढळले.

हे आहेत दुष्परिणाम

१) लीड श्वास घेताना आणि अन्य कारणांनी शरीरात जाऊ शकते.
२) यामुळे श्वासाचे विकार होऊ शकतात.
३) पोटाचे विकार तर होतात.
४) मेंदूवरही विपरित परिणाम होतो.

हे लक्षात ठेवा

१) महिलांनी कुंकू वापरताना काळजी घ्यावी.
२) लहान मुलांच्या संपर्कात कुंकू येऊ देऊ नका.
३) लहान मुलांच्याही आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु