ताक प्यायल्याने होतात ‘हे’ ११ चमत्कारी फायदे, जाणून घ्या

ताक प्यायल्याने होतात ‘हे’ ११ चमत्कारी फायदे, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्वादीष्ट ताक आणि मठ्ठा पिणे आरोग्यासाठी खुप फादेशीर आहे. यामुळे शरीराला पोषक तत्त्व सुद्धा मिळतात. ताकामुळे शरीर ताजे तवाने राहते. तरतरी कायम राहते. ताक पिण्याचे आणखी काही अनोखे फायदे असून याविषयी जाणून घेवूयात.

हे फायदे होतात

* ताकामुळे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स शरीराला मिळते. यामुळे अन्नातून उर्जा निर्माण करण्याची क्षमता सुधारते. तसेच हार्मोन्सचे सिक्रेशन आणि पचन सुधारते.

* ताकामधील आले, काळीमिरी, जिरे पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामधील पाचक गुणधर्म पचनकार्य सुरळीत करतात.

* दुधाऐवजी ताक हा कॅल्शियमसाठी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या शरीराला कॅल्शियमचा पुरवठा होण्यास मदत होते.

* कफची समस्या असेल तर ताकात ओवा टाकूण प्यावे. पोट साफ होण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लस्सीमध्ये पुदीना टाकूण प्यावे.

* पोट खराब असल्यास ताक प्यायल्याने फायदा होईल. यातील लैक्टिक अ‍ॅसिड इम्यून सिस्टमला चांगले बनवते आणि आजारांशी लढण्याची शक्ती देते.

* यात पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.

* मसालेदार पदार्थांचा त्रास रोखण्यासाठी ताक फायदेशीर ठरते. ताकामधील जिरे, मीरपूड, कढीपत्ता पोटामध्ये मसाल्यामुळे होणारी जळजळ कमी करतात.

* दुधातील बायोअ‍ॅक्टीव्ह प्रोटीन घटक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. अ‍ॅन्टी व्हायरल, अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टिकॅन्सर घटकामुळे ताक आरोग्यदायी ठरते. ताकामुळे रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते.

* शरीरात वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी ताक फायदेशीर ठरते. आयुर्वेदानुसार ग्लासभर ताक नियमित पिणे फायदेशीर ठरते.

* वजन कमी करण्यासाठी ताक फायदेशीर आहे, कारण यामध्ये फॅट कंटेंट खुप कमी प्रमात असतात. हे अन्न नलीका आणि अमाशयमध्ये जमा झालेले फॅट कमी करते.

* यामध्ये चांगले प्रोबायोटिक्स असतात, जे पचन नलिकेमधील नुकसानदायक बॅक्टेरियाला वाढू देत नाहीत. यामुळे कँसरची भीती कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु