हरभरे भिजवून खाल्ल्याने होतात ‘हे’ खास १० आरोग्य लाभ, जाणून घ्या

हरभरे भिजवून खाल्ल्याने होतात ‘हे’ खास १० आरोग्य लाभ, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हरभरे हे पौष्टिकतेच्या बाबतीत बदामापेक्षा जास्त लाभदायक आहेत. भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये प्रोटीन, फायबर, मिनरल आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. यामुळे विविध आजार दूर राहू शकतात. आरोग्यासाठी हे कडधान्य खुप फायदेशिर आहे. भिजवलेले हरभरे सेवन केल्यास कोणते फायदे होतात, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

असे भिजवा
मुठभर हरभरे स्वच्छ करुन माती किंवा चीनी मातीच्या स्वच्छ भांड्यात टाकून त्यामध्ये स्वच्छ पाणी टाका. हे रात्रभर भिजू द्या. सकाळी हे हरभरे चावून खावेत. हरभरे भिजवलेले पाणी गाळून पिणे सुद्धा लाभदायक आहे.

हे आहेत फायदे

१ स्पर्म काउंट वाढेल
एक चमचा साखरेसोबत मुठभर भिजवलेले हरभरे सकाळी खाल्ल्याने स्पर्म काउंट वाढते.

२ फर्टिलिटी वाढते
रोज सकाळी मुठभर हरभरे मधासोबत खाल्ल्याने फर्टिलिटी वाढते.

३ शक्ती आणि उर्जा
भिजवलेले मुठभर हरभरे खाल्ल्याने शक्ती आणि उर्जा मिळते. शरीराची कमजोरी दूर होते.

४ बद्धकोष्ठता
भिजवलेल्या हरभऱ्यात भरपूर फायबर असतात. पोट साफ राहते. बद्धकोष्ठता होत नाही.

५ युरिन प्रॉब्लेम
भिजवलेले हरभरे गुळासोबत खाल्ल्याने वारंवार लघवी येण्याचा त्रास कमी होतो. मुळव्याधीच्या त्रासातही आराम मिळतो.

६ निरोगी त्वचा
हरभऱ्यात मीठ टाकून खाल्ल्याने त्वचा निरोगी आणि तजेलदार होते. तसेच त्वचेच्या अन्य समस्याही दूर होतात.

७ वजन वाढते
हरभरे नियमित खाल्ल्याने वजन वाढते.

८ सर्दी-पडसे
हरभरे खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे सर्दी-पडशासारखे आजार होत नाहीत.

९ डायबिटीज
भिजवलेले हरभरे नियमित खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. डायबिटीजपासून बचाव होतो.

१० रक्ताची कमतरता
हरभरे आयर्नचा उत्तम सोर्स आहे. रक्ताची कमतरता दूर होते. रक्त शुद्ध होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु