मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मोड आलेल्या कडध्यान्यांत असलेले अनेक पोषक घटक विविध आजारांना दूर ठेवतात. मोड येण्याच्या प्रक्रियेने कडधान्यांत असणारे खनिज द्रव्य शरीरात सहज मिसळतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पाचन प्रक्रिया सुधारते. मोड आलेल्या कडधान्यांपासून विविध पदार्थ तयार केले जातात. परंतु, असे म्हटले जाते की, मोड आलेल्या कडधान्यांचा पदार्थांमध्ये वापर केल्यास त्यांच्यातील पोषक तत्त्वे कमी होतात. त्यामुळे काही आहारतज्ज्ञ मोड आलेली कच्ची कडधान्ये सकाळी नाष्ट्यामध्ये खाण्यास सांगतात. मोड आलेली कडधान्ये खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. मात्र, त्यामागील कारणे आपल्याला माहित नसतात. ही कारणे आपण येथे जाणून घेणार आहोत.

हे फायदे होतात

१ ) दीर्घ काळापर्यंत अशा अन्नाचा आहारात समावेश असल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

२) कडधान्यात असणारे पोषक तत्त्व अंकुरित केल्याने वाढतात.

३) मोड आलेल्या कडधान्यात जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. परिणामी, हाडे मजबूत होतात.

४) अशी कडधान्ये खाल्ल्याने शरीरात असणारे हानिकारक अँसिड्स सहज बाहेर पडतात.

५) याच्या सेवनाने अनेक आजारांपासून लांब राहू शकता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु