आरोग्यासोबतच सौंदर्यही वाढवण्यात मदत करते शेंगदाण्याचे तेल, जाणून घ्या

आरोग्यासोबतच सौंदर्यही वाढवण्यात मदत करते शेंगदाण्याचे तेल, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – हृदयाची काळजी घेण्यासाठी सध्या विविध प्रकारची खाद्यतेल बाजारात उपलब्ध आहेत. बहुसंख्य लोक खाद्यतेल उत्पादक कंपन्यांच्या जाहिरातींना बळी पडून ही खाद्यतेल सेवन करत असतात. पूर्वी सर्रास शेंगदाणा तेलाचा वापर स्वयंपाकासाठी केला जात असे. मात्र, सध्या शेंगदाणा तेलाचा वापर कमी झाला असल्याचे दिसून येते. परंतु, शेंगदाणा तेल हे आरोग्यासह सौंदर्य वाढवण्यासाठीसुध्दा लाभदायक आहे. यात फॅटी अ‍ॅसिड संतुलित प्रमाणात असते. यामुळे हे फॅट वाढवत नाही. या तेलाचे कोणकोणते फायदे आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

हे आहेत फायदे

हे नॅचरल स्किन केयर असून कोरड्या त्वचेवर लावल्याने फायदा होतो.

पोटासंबंधीत समस्या दूर होतात. बध्दकोष्ठता, पचनक्रिया, डायरिया या रोगांपासून आराम मिळतो.

डायबिटिज असल्यास शेंगदाण्याच्या तेलाचे सेवन करावे. यामुळे शरीरात इन्सुलिन भरपूर प्रमाणात राहते. रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य राहते.

केसांमध्ये कोंडा असेल तर शेंगदाण्याचे तेल केसांवर लावावे. दोन तीन तास तसेच ठेवल्यास कोंडा दूर होतो. केसांमधील प्रोटीनची कमतरता दूर करते. दोनतोंडी केसांची समस्या दूर होते.

शेंगदाणा तेलामध्ये एमयूएफए भरपूर असल्याने फॅट अधिक प्रमाणात जमा होत नाही. बॅड कोलेस्टेरॉल जमा होत नाहीत. रक्त प्रवाह सुरळीत राहतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु