मेथीची भाजी ‘या’ आजारांवर गुणकारी, जाणून घ्या

मेथीची भाजी ‘या’ आजारांवर गुणकारी, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पालेभाज्या या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. असं आपल्याला अनेक आहारतज्ञ सांगतात.  काही भाज्या तर आपल्या आरोग्यासाठी एवढ्या फायदेशीर आहेत की त्यामुळे आपले अनेक आजार नियंत्रणात येण्यास मदत होते. अशीच एक सर्वांची आवडती भाजी म्हणजे मेथी. ही भाजी खाल्ल्याने आपले अनेक आजार नष्ट होतात. जाणून घेऊयात मेथीची भाजी कोणत्या आजारांवर गुणकारी आहे.

१) उच्च रक्तदाब –

मेथीची भाजी उच्च रक्तदाब असणाऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही मेथी आणि सोया यांचे ५ ग्रॅम एकत्र मिश्रण करून सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मेथी ही औषधी वनस्पती असून पचन शक्ती आणि भूक वाढवण्यास मदत करते.
मेथीची भाजी ‘या’ आजारांवर गुणकारी, जाणून घ्या
२) कोलेस्ट्रॉल- 

रक्त लिपिडची पातळी मजबूत करण्यासाठी मेथीचा उपयोग होतो. आणि एथेरोस्क्लेरोसिस कमी करण्यास ही मदत होते. मेथीपासून लिपिडने ग्रस्त असणाऱ्या रोग्यांना मेथीचे औषधी वनस्पती म्हणून अधिक फायदा होतो. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रीत करण्यास मेथी उपयुक्त आहे. तयामुळे मेथीच्या भाजीचा आपल्या आहारात समावेश करा.
मेथीची भाजी ‘या’ आजारांवर गुणकारी, जाणून घ्या
३) त्वचेसाठी  गुणकारी –

मेथीमध्ये विटामिन ‘सी’ आणि आयर्न असल्याने त्वचेवरील संसर्ग जंतू नष्ट करण्यास मदत होते. यामध्ये त्वचेवरील मुरूमांच्या समस्या दूर होवून गडद काले डाग कमी होण्यास मदत होते.
मेथीची भाजी ‘या’ आजारांवर गुणकारी, जाणून घ्या
३) पोटाची समस्या-

पोटाच्या समस्या बध्दकोष्ठता, अँसिडीटी, अतिसार, वेदना  यावर मेथी उपयुक्त आहे. मेथीमध्ये एंटी-इंफ्लेमेट्री आणि विटामीन ‘सी’ असल्याने पोटाची अँलर्जी कमी करण्यास मदत होते.
मेथीची भाजी ‘या’ आजारांवर गुणकारी, जाणून घ्या
४) मधुमेह नियंत्रित करते-

मेथीचा प्रभाव गार असल्याने शरीरातील ग्लुकोजच्या मेटाबॉलिज्मवर नियंत्रण ठेवले जाते. शरीरात मेथीचे घटक  अँटी-डायबेटिज सारखे काम करत असल्याने मधुमेह टाइप-२ झालेल्या लोकांना  त्याचा खुप फायदा होतो.

मेथीची भाजी ‘या’ आजारांवर गुणकारी, जाणून घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु