हार्ट ब्‍लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या

हार्ट ब्‍लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चूकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे हार्ट ब्‍लॉकेज ही समस्या वाढत चालली आहे. हृदयातील नसा ब्लॉक झाल्यामुळे हार्टअटॅक येतो. यापासून दूर राहण्याचे काही सोपे आयुर्वेदिक उपाय असून ते आपण जाणून घेणार आहोत. यावर उपाय करताना रक्तामध्ये आम्लता अ‍ॅसिडिटी वाढविणारे म्हणजेच आम्लधर्मी पदार्थ वापरावेत. हे पदार्थ खाल्ल्याने रक्तामध्ये वाढलेली अ‍ॅसिडिटी कमी होते आणि हार्ट ब्‍लॉकेज होत नाही.

भोपळ्याचा ज्यूस
सर्व भाज्यांमध्ये भोपळा सर्वात जास्त आम्लधर्मी आहे. दररोज भोपळ्याचे २०० ते ३००एमएल ज्यूस घ्यावे. कच्चा भोपळा सुद्धा खाता येईल. भोपळ्याचे ज्यूस सकाळी शौच करून आल्यानंतर प्यावे. तसेच नाष्टा केल्यानंतर अध्र्या तासाने सुद्धा हे ज्यूस घेऊ शकता. यात पुदिना किंवा तुळशीचे ८-१० पाने टाकू शकता. काळेमीठसुद्धा टाकू शकता. भोपळ्याच्या ज्यूसमध्ये आयोडीनयुक्त मीठ मिसळू नये.

ही काळजी घ्या
* ज्यूस तयार करण्यापूर्वी भोपळा कापून त्याची चव घ्यावी. जर याची चव कडू असेल तर त्या भोपळ्याचे ज्यूस घेऊ नये.
* भोपळ्याचे ज्यूस इतर कोणत्याही ज्यूससोबत घेऊ नये.

अर्जुन वृक्षाची साल
अर्जुन वृक्षाच्या सालीचे २ चमचे चूर्ण १ ग्लास पाण्यामध्ये पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड करून दिवसातून दोन वेळेस घ्या. हे पाणी रिकाम्या पोटी घ्यावे. याचा उपयोग २-३ महिने करावा. काही दिवसातच फरक दिसून येतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु