कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – अवयवदान या संकल्पनेतल्या मूत्रपिंडाच्या, डोळ्यांच्या किंवा अगदीच यकृताच्या प्रत्यारोपणाबद्दल बहुतेक जणांनी ऐकलेले असेल पण हृदयाचे प्रत्यारोपण ही बाब अजूनही आपल्याकडे नवीनच समजली जाते.परंतु आता ‘मेंदू मृत’ म्हणजे ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवांचे दान केल्याने कोणत्याही गरजूला जीवदान मिळू शकते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूरमध्ये झालेल्या अवयवदानामुळे पुण्याच्या भिगवण गावातील 30 वर्षीय शेतकऱ्याला जीवदान मिळाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कोल्हापुरातील १८ वर्षांच्या मुलाचा अपघात झाला होता. त्या मुलाला डोक्याला खूप मार लागला होता. त्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आणि तो ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्याच्या केलेल्या अवयवदानाचा पुण्यातील शेतकऱ्याला फायदा झाला. यामुळे कोल्हापूरचं हृदय आता पुण्यात धडधडत आहे.

दरम्यान सह्याद्री रुग्णालयातील काही कर्मचारी दान केलेलं हृदय आणायला रात्री कोल्हापूरला गेली. आणि ते आल्यावर लगेच सकाळी ७:३० च्या दरम्यान त्यांनी सहयाद्री रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरुवात केली. जवळपास ५ तासानंतर हि शस्रक्रिया यशस्वी झाली.

हि शस्र्क्रिया डॉ. मनोज दुराईराज आणि त्यांचे सहकारी डॉ. राजेश कौशिश, वरिष्ठ कार्डियाक सर्जन डॉ संदीप तादास, डॉ सुहास सोनवणे, डॉ. सौरभ बोकील, डॉ. स्वाती निकम, हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे भूलतज्ज्ञ डॉ. शांतनु शास्त्री, वरिष्ठ कार्डिओथोरॅसिक आणि व्हेस्कुलर सर्जन (सीटीव्हीएस) आदींनी यशस्वी केली.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु