केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

 
केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : केळ्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने आरोग्यासाठी केळी चांगली असतात. तज्ज्ञ सुद्धा केळी खाण्यास सांगतात. परंतु, केळीची साल सुद्धा तेवढीच महत्वाची असते, हे खूपच कमी लोकांना माहिती असेल. केळीच्या सालाचे काही उपाय चकित करणारे आहेत. चेहऱ्यासाठी, आरोग्यासाठी, केसांसाठी अशा अनेक समस्यांवर केळीची साल उपयोगी असते.
हे आहेत केळीच्या सालीचे फायदे.

१ केळीच्या सालीत पोटॅशियम मुबलक असल्याने या सालीने बुटाला पॉलिश करावे, बुट चमकतात.

२ केळीची साल चेहऱ्यावर हलक्या हाताने घासा, वीस मिनिटानंतर कपड्याने चेहरा पुसून घ्या.

३ केळीची साल आतल्या बाजून स्किनवर घासल्यास सुरकुत्या लवकर पडत नाहीत.

४ एखाद्या लहान किड्याने चावले असल्यास तिथे काही मिनिटे केळ्याची साल ठेवावी, जळजळ बंद होते.

५ काही मिनिटे केळ्याची साल डोळ्यांवर ठेवा, शांत वाटते.

६ रात्री झोपताना केळ्याची साल मसवर बँडेजने बांधा. असे केल्याने काही दिवसांनंतर मस निघून जाते.

७ केळीच्या सालीवर मोहरीचे तेल टाकून वेदना होत असलेल्या जागेवर घासा, वेदना थांबतात.

७ केळीची साल दातांवर घासल्यास दात स्वच्छ आणि चमकदार होतात.

८ सोरायसिस झाल्यावर केळीची साल बारिक करून त्या ठिकाणी लावा.असे केल्याने डाग दूर होतात आणि आराम मिळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु