जाणून घ्या, शरीरात कुठे होतो पाण्याचा उपयोग, परिस्थितीनुसार प्या पाणी

जाणून घ्या, शरीरात कुठे होतो पाण्याचा उपयोग, परिस्थितीनुसार प्या पाणी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दिवसभरात एका प्रौढ व्यक्तीने किती पाणी प्यावे, याबाबत वेगवेगळे मत तज्ज्ञसुद्धा व्यक्त करतात. त्यामुळे या प्रश्नाबाबत संभ्रम कायम राहतो. परंतु, आपण करत असलेले काम, आजुबाजूचे वातावरण यावर पाण्याचे प्रमाण अवलंबून आहे. तसेच कोणता आहार तुम्ही घेता यावर सुद्धा ते अवलंबून आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही जास्त पाणी असलेला आहार दिवसभरात घेतला तर पाण्याचे दिवसभरातील प्रमाण कमी केले पाहिजे.

पाण्याची अंदाजे गरज – 
* सामान्य वातावरणात व्यक्तीला दिवसभर १२-१६ ग्लास (३ ते ४ लिटर)
* एअरकंडिश्नरमध्ये जास्त काळ केल्यास २.५-३ लिटर
* भरउन्हात काम केल्यास आणि व्यायाम करणारांसाठी ५-६ लिटर पाणी

यासाठी पाणी आवश्यक – 
१) सांध्यात मऊपणा येण्यासाठी
२) मेंदूत हार्मोन, न्युरो ट्रांसमीटर बनवण्यासाठी
३) शरीराचे तापमान नियंत्रणात आणण्यासाठी
४) पाठीचा कणा आणि मस्तकासाठी शॉक एब्जॉर्बरसाठी
५) अन्नाचे पोषण द्रव्यांमध्ये रुपांतर करण्यासाठी
६) शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी
७) पाण्यामुळे लाळ बनते, यामुळे अन्न पचन होते
८) म्युकस मेंबरेन म्हणजेच त्वचेवरील थराच्या मऊपणासाठी
९) पेशींच्या निर्मितीसाठी
१०) शरीरातील विषारी पदार्थ काढण्यासाठी

जास्त पाण्याचे धोके –
* पाचक रसाचा परिणाम कमी होतो. अन्न उशिराने पचते.
* जेवणानंतर लगेच थंड पाणी पिल्याने जास्तीची चरबी बनते. हृदयविकाराचा धोका वाढतो.
* किडनीवर जास्त दाब पडतो.
* शरीरातील पेशींना इजा होऊ शकते.
* सोडियमचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत कमी होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु