मनोपॉजच्या काळात महिलांसाठी ‘हा’ आहार ‘योग्य’, जाणून घ्या

मनोपॉजच्या काळात महिलांसाठी ‘हा’ आहार ‘योग्य’, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मेनोपॉज ही स्त्रीच्या आयुष्यातली स्वाभाविक घटना असली तरी नैसर्गिक अवस्था असल्यामुळे त्यामुळे त्रास होतोच, असे नाही. होत असलेल्या बदलांना जर शारीरिकदृष्ट्या मदत मिळू शकली आणि मानसिकरीत्या स्वीकारण्याची तयारी ठेवली, तरी रजोनिवृत्तीतील त्रासांपासून दूर राहता येणे अवघड नाही. तसेच या काळात महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. महिलांनी या काळात कोणता आहार घ्यावा. याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

१) मेनोपॉजच्या काळात महिलांनी कॅल्शियमने भरपूर खाद्य पदार्थ जसे की फिश, ब्रोकली, डाळी, हिरव्या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजे.

२) अधिक मात्रेत साखर आणि मीठ घेतल्याने डायबिटीज व ब्लडप्रेशरची समस्या असू शकते, म्हणून यांचे सेवन कमी मात्रेत करायला पाहिजे.

३) कमीत कमी दीड कप फळ आणि २ कप भाज्यांचे सेवन रोज केले पाहिजे.

४) हाडांच्या मजबुतीसाठी रोज २०-३० मिनिट सकाळी कोवळ्या ऊन्हात बसायला पाहिजे.

५) आपल्या वजनाला मेंटेन ठेवण्यासाठी हाय फॅट फूडला आपल्या डायटमधून
काढून टाका.

६)  एक्सपर्ट डायटीशियन आणि न्यूट्रीशनिस्टला भेटा, जी तुमच्या बॉडी वेटच्या रिक्वायरमेंटनुसार डायट चार्ट बनवून देईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु