डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,

डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  पावसाळ्यात डेंग्यूसारखा घातक आजार होण्याची शक्यता बळावते. जुलै ते ऑक्टोबरमध्ये हा धोका जास्त असतो. याकाळात डेंग्यूचे डास मोठ्याप्रमाणात वाढतात. हा धोका टाळण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे असते. डेंग्यूचा डास सामान्य डासांपेक्षा खूप वेगळा असतो. या डासांविषयी थोडी वेगळी माहिती जाणून घेवूयात.

असा आहे डेंग्यूचा डास

१) एडीज डास चावल्यानंतर ३ ते ५ दिवसांत डेंग्यूची लक्षणे दिसतात.
२) हा डास सामान्य डासांपेक्षा वेगळा दिसतो.
३) या डासाच्या शरीरावर चित्त्यासारख्या रेषा असतात.
४) हे डास नेहमी प्रकाशातच चावतात.
५) डेंग्यूचा डास शक्यतो दिवसा, विशेषतः सकाळच्यावेळी चावतो.
६) रात्रीच्यावेळी प्रकाश जास्त असेल तरीही चावू शकतो.
७) एडीज इजिप्ट डास खूप उंच उडू शकत नाही.
८) हे डास स्वच्छ पाण्यामध्ये वाढतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु