मानवी सांगाड्याशी संबंधित ८ चकित करणारी तथ्य माहित आहेत का?

मानवी सांगाड्याशी संबंधित ८ चकित करणारी तथ्य माहित आहेत का?

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हाडांना आयुष्भर काळजी आणि पोषणाची आवश्यकता असते. रक्ताची संरचना कायम ठेवणे, शरीराची हालचाल आणि नवीन कोशिकांचे निर्माण करणे, अशी महत्त्वपूर्ण कार्य मानवी सांगाडा करतो. मनुष्य सांगाड्याशी संबंधित चकित करणारी काही तथ्य आपण जाणून घेणार आहोत.

अर्ध्यापेक्षा जास्त हाडे हात आणि पायात 
शरीरातील अर्ध्यापेक्षा जास्त हाडे हात आणि पायामध्ये असतात. शरीरामध्ये हाडांचे विभाजन समान नसते. हातामध्ये २७ आणि पायामध्ये २६ हाडे असतात. याचा अर्थ दोन्ही हात आणि पायामध्ये एकूण १०६ हाडे असतात.

हाडे जिवंत असतात
हाडे मृत कोशिका नाहीत. हाडे जोपर्यंत मनुष्याच्या शरीरात असतात तोपर्यंत जिवंत असतात. हाडांचे नस आणि रक्त वाहकांचे नेटवर्क असते. ते कॅल्शियम गोळा करू शकतात आणि यामध्ये जिवंत कोशिका असतात.

सर्वात मजबूत नाही
मनुष्य शरीरात हाडांपेक्षा सर्वात मजबूत दातांचे आवरण असते. टूथ इनॅमल दातांचे रक्षण करते. कॅल्शियमसारख्या मिनरल्सच्या उपस्थितीमुळे हे मजबूत असते.

लहान मुलांमध्ये जास्त हाडे 
एका वयस्क व्यक्तीच्या शरीरात २०६ हाडे असतात तर लहान मुलाच्या शरीरात ३०० हाडे असतात. यामधील काही हाडे विरघळतात आणि काही एकरूप होतात.

हाडे स्टीलपेक्षा मजबूत 
हाडे मजबूत असतात. याची तुलना एखाद्या मजबूत गोष्टीशी करू शकता. हाडे स्टीलच्या तुलनेत ६ पट जास्त मजबूत असतात.

पायाच्या बोटांचे हाड कमकुवत
शरीरात पायाच्या बोटाचे हाड सर्वात जास्त कमजोर असते. पायाचे बोट नेहमी किंवा कधीकधी तुटते. याच्यावर उपचार करण्याशिवाय तुमच्याकडे इतर कोणताही दुसरा पर्याय नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु