‘हे’ आहेत प्रोस्टेट कॅन्सर बाबतचे ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या

‘हे’ आहेत प्रोस्टेट कॅन्सर बाबतचे ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे  प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये आढळणारा कॅन्सर आहे. वयाच्या ५० वर्षानंतर पुरुषांना हा कॅन्सर होऊ शकतो. हा कॅन्सर सुरवातीच्या टप्प्यावर कोणालाच कळत नाही. आणि शेवटच्या टप्यावर गेल्यानंतर काही उपयोग होत नाही. त्यामुळे या कॅन्सर बाबतचे जे गैरसमज आहेत ते जाणून घ्या.

१) प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण हे प्रामुख्याने 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील असतात. मात्र हा त्रास 35-45 वयोगटातील लोकांमध्येही आढळून येऊ शकतो. अनेकांमध्ये   PSA test झाल्यानंतरच अंतिम टप्प्यात पोहचलेला कॅन्सर आढळतो. अनेकदा कॅन्सरची वाढ होत असूनही मुत्रविसर्जनाच्या वेळेस त्रास, जळजळ किंवा वेदना असा त्रास होत नाही. म्हणूनच त्याचे निदान खूप उशिरा आणि अंतिम टप्प्यात पोहचल्यावर होते.

२) हा एक गैरसमज प्रामुख्याने पुरूषांमध्ये आढळतो. इतर कॅन्सरप्रमाणेच प्रोस्टेट कॅन्सरही सुरवातीच्या टप्प्यांत कोणतीच ठळक लक्षण दाखवत नाही. सुरवातीच्या टप्प्यांत फारच सौम्य प्रमाणात त्रास होतो. पाठीजवळ खालच्या बाजूला वेदना जाणवण्यासारखी लक्षणं दिसतात.

३) काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रोस्टेट कॅन्सर हा भारतात विरळ आढळत होता. मात्र आता हे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. येत्या २०२० पर्यंत प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांच्या प्रमाणात दुप्पटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

४) खाण्याच्या किंवा जीवनशैलीतील सवयींचा प्रोस्टेट कॅन्सरवर कोणताही परिणाम नसतो. ताजी फळं आणि भाज्या खाणार्‍यांमध्ये हा धोका ३५ टक्के  कमी असतो. कमीत कमी कार्बोहायड्रेट्स, टॉमेटो आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड आहारात असल्यास प्रोस्टेट कॅन्सरचा धोका आणि वाढ इतरांच्या तुलनेत कमी होतो. हळदीतील क्युरक्युमिन घटकही कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतो. योग्य व्यायामानेदेखील कॅन्सरचा धोका आटोक्यात ठेवता येतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु