‘या’ पाच मिनिटांच्या उपायाने ३० दिवसांत कमी होईल वजन, जाणून घ्या

‘या’ पाच मिनिटांच्या उपायाने ३० दिवसांत कमी होईल वजन, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  वजन कमी करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. परंतु, अनेकदा घाम गाळूनही वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी व्यायामासह योग्य आहार खुप महत्वाचा आहे. वजन कमी करण्यासाठी लिंबू-पाणी हा एक चांगला पर्याय असला तरी तो आणखी प्रभावी करण्यासाठी यामध्ये मध आणि दोन चिमूट दालचिनी पावडर मिसळावी. दालचिनीतील अँटिऑक्सिडंट्समुळे भूक कमी लागते. रक्तातील साखरही नियंत्रित होते. तसेच चयापचय चांगले होऊन अतिरिक्त चरबी निघून जाते. यामुळे वजन लवकर कमी होते. हा उपाय कसा करावा, याविषयी माहिती घेवूयात.

असे तयार करा पाणी –
दालचिनी पावडर, लिंबू, पाणी, मध घ्या. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा. यात अर्धा चमचा मध आणि दोन चिमूट दालचिनी पावडर मिसळून प्या. हे रोज सकाळी उपाशीपोटी प्यावे. यामुळे ३० दिवसात वजन कमी होते. यात दालचिनीचे प्रमाण वाढवू नका. कारण जास्त वापरल्यास नुकसान होऊ शकते.

ही दक्षता घ्या –

* गोड खाणे टाळा.
* रोज सकाळी दहा मिनिटे पश्चिमोत्तानासन आणि नौकासन करा.

दालचिनीचे अन्य उपाय – 

* पाणी गरम करून त्यामध्ये दालचिनी टाका. हे गाळून प्या.
* दुधी भोपळ्याच्या ज्यूसमध्ये दालचिनी पावडरचे काही थेंब टाकून प्या.
* अद्रकेच्या चहामध्ये दालचिनी पावडर टाकून प्या.
* ब्लॅक टीमध्ये दालचिनी टाकून प्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु