मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ज्येष्ठांनी अवश्य करावे ‘हे’ एक काम, जाणून घ्या

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ज्येष्ठांनी अवश्य करावे ‘हे’ एक काम, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वय वाढत जाते तसे मेंदूची कार्यक्षमता कमी-कमी होत जाते. वृद्ध व्यक्तींना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विस्मरण ही यापैकी एक मोठी समस्या होय. स्मरणशक्ती कमी झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. परंतु, काही हलके-फुलके केल्यास मेंदुची कार्यक्षमता चांगली राहु शकते. यासाठी अवजड व्यायाम करण्याची गरज नाही. यासंदर्भात मियामी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक जॉयस गोम्स ओस्मान यांनी मेंदूच्या व्यायामासाठी एक प्रिस्क्रिप्शन तयार केले आहे.

व्यायामामुळे येते गती
गोम्स ओस्मान यांनी शंभरपेक्षा जास्त संशोधने मेंदूच्या १२२ कामांशी जोडून पाहिली. ११ हजार ज्येष्ठांवर त्यांनी प्रयोग केला. या प्रयोगात असे आढळून आले की, जर ६ महिन्यांच्या काळात ५२ तास व्यायाम केला तर मेंदूत अनेक सुधारणा होतात. एवढा व्यायाम करणे कठीण नाही. या व्यायामामुळे स्मृती चांगली राहते. रिझनिंग, रिकॉल आणि एखाद्याच्या ओळखण्याच्या प्रक्रियेत व्यायामामुळे खूप गती येते, असे जॉयस गोम्स ओस्मान यांना आढळून आले.

यामुळे काय होणार
व्यायाम केल्याने मेंदूवर चांगला प्रभाव पडतो. मेंदूतील नसांचे जाळे चांगले राहते. वाढत्या वयात हे जाळे खराब होते. व्यायाम केल्याने मेंदूत रक्त संचारण चांगले राहते. विचार करण्याची शक्तीही चांगली राहते. यासाठी अवजड व्यायाम करण्याची गरज नाही, एअरोबिकही करू शकता. वेट ट्रेनिंग करू शकता. मेंदुची ओळखण्याची क्षमता कायम राखणे महत्वाचे आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु