थंड पाण्याने अंघोळ केल्यास होतील ‘हे’ ८ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

थंड पाण्याने अंघोळ केल्यास होतील ‘हे’ ८ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आंघोळ ही कोमट, गरम अथवा थंड पाण्याने केली जाते. परंतु, थंड पाण्याने अंघोळ करणे अधिक ताजेतवाने करणारे असल्याचे आढळून आले आहे. दिवसभर फ्रेश राहण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करावी. थंड पाण्याने अंघोळ केल्याने शारीरिक सौंदर्यदेखील टिकते, असे तज्ज्ञ सांगतात. थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

१) थंड पाणी मेंदूला ताजेतवाने करते. तसेच अनेक प्रकारच्या आजारांनाही दूर ठेवते.

२) नियमित थंड पाण्याने अंघोळ केल्यास लठ्ठपणा कमी होतो.

३) थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते. ताणतणावही दूर होतो.

४) यामुळे मेंदूला गारवा मिळतो. डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

५) रोग प्रतिकारशक्ती वाढते. संक्रमणापासून बचाव होतो.

६) थकवा दूर होऊन रात्री झोप चांगली लागते.

७) रक्तप्रवाह सुरुवातीला मंद होतो आणि नंतर उत्तेजित होतो. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गरम पाण्याने अंघोळ केल्यास रक्त प्रवाह सुरुवातीला उत्तेजित होतो आणि त्यानंतर मंद होतो, यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

८) आळस, थकवा आणि वेदना दूर होतात. त्वचेची खाज, जळजळ दूर होते. रक्त स्वच्छ होते. त्वचेची चकाकी वाढते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु