चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही. किंवा सध्याचे धावपळीचे आयुष्य, कामाचा तणाव यामुळे आपली चीडचिड होते. पण आपली चिडचिड होण्याला अजूनही काही कारणे आहेत. नेमकं कोणत्या कारणामुळे आपली चिडचिड होते. ते जाणून घेऊया.

चिडचिड होण्याची कारणे खालील प्रमाणे

१) डोकेदुखी:

दिवसभर कामचा व्याप किंवा पित्त यामुळे आपले डोके दुखते. याचा थेट परिणाम आपल्या डोक्यावर होतो. आणि आपले डोके दुखते. डोक दुखायला लागलं की आपली चिडचिड होते.

२) दातदुखी:
अनेकांना दातांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. दात किडल्यामुळे किंवा हिरड्याला सूज आल्यामुळे आपला दात दुखू लागतो.त्यामुळ आपलं कुठच मन लागत नाही. त्यात एखादी गोष्ट खटकली की आपली चिडचिड होते.

३) संधीवात:

संधीवात हा आपण समजतो तेवढा सोपा आजार नाही. यामुळं आपल्याला खुप त्रास सहन करावा. याच्या त्रासामुळे आपली चिडचिड होते.

४) पोट साफ न होणे:

अनेकांना पित्ताचा त्रास असतो. आणि त्यांचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे त्यांचे पोटही साफ होत नाही. पोट व्यवस्थित साफ झाले नाही तर त्या व्यक्तीची चिडचिड होते.

५) थायरॉईडचे विकार:
हा आजार जास्त करून महिलांमध्ये आढळतो. आजाराने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. भूक जास्त लागते, वजन वाढते त्यामुळं आपली चिडचिड होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु