‘या’ ६ सवयी लावून घेतल्या तर दातांचे आरोग्य राहील चांगले, जाणून घ्या

‘या’ ६ सवयी लावून घेतल्या तर दातांचे आरोग्य राहील चांगले, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सौंदर्य खुलून दिसावे म्हणून विविध प्रयत्न केले जातात. परंतु, चेहरा, त्वचा आणि केसांच्या बाह्य सौंदर्यापेक्षाही आतील सौंदर्य खुप महत्वाचे ठरते. परंतु, याकडे नकळत दुर्लक्ष होते. विशेष म्हणजे सौंदर्य जपण्यासाठी आपले दातसुद्धा निरोगी असावेत असे अनेकांना वाटतव नाही. दात निरोगी असतील तर तुमचे शारीरिक आरोग्य चांगले राहू शकते. दातांची निगा राखण्यासाठी कोणत्या सवयी लावून घ्याव्यात याची माहिती घेवूयात.

या सवयी महत्वाच्या
खाण्याच्या सवयी
कॉफी, चहा किंवा शीतपेयांचे अतिसेवन करू नये. यामुळे दात लवकर खराब होतात. सुपारी, मुखवास चघळल्यानेही दात खराब होतात.

जिभेची स्वच्छता
दात स्वच्छ करत असताना जीभदेखील स्वच्छ करा.

हिरड्यांची काळजी
दात निरोगी राहण्यासाठी हिरड्यांचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

नियमित तपासणी
दर सहा महिन्यांनी डॉक्टरांकडे जाऊन दातांची तपासणी करा.

दोन वेळा ब्रश
सकाळी झोपेतून उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केल्याने दात निरोगी राहतात.

चूळ भरा
कोणता पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच चूळ भरुन तोंड व दात स्वच्छ करा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु