मिठ जास्त खाल्ल्याने आरोग्यावर होतात ‘हे’ घातक परिणाम, जाणून घ्या

मिठ जास्त खाल्ल्याने आरोग्यावर होतात ‘हे’ घातक परिणाम, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पदार्थाला योग्य ती चव येण्यासाठी मिठ आवश्यक असते. मिठाशिवाय कोणताही पदार्थ चवदार होऊ शकत नाही. मात्र, दररोज किती प्रमाणात मिठ खावे, याचे प्रमाण ठरलेले असून त्यापेक्षा जास्त मिठ सेवन केल्यास आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. रोज पाच ग्रॅम मिठ खाणे हे योग्य प्रमाण आहे. मात्र, यापेक्षा जास्त मिठ खाणे तब्येतीसाठी घातक ठरू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

हे लक्षात ठेवा

१) दररोज १३.७ ग्रॅम किंवा त्यापेक्षा अधिक मिठ खाणाऱ्यांना रक्तदाबासह अन्य व्याधींचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो.

२) सतत अधिक मिठ खाल्ल्याने रक्तदाबास विविध आजार होण्याचा संभव वाढतो.

३) कमी म्हणजेच ६.८ ग्रॅम मिठ खाणाऱ्यांना धोका कमी असला तरी त्यांचे मिठ खाण्याचे प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्तच आहे. दिवसाला ५ ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी मिठ खाणे योग्य आहे.

४) खारट पदार्थ न खाणे, जेवताना वरुन मिठ न घेणे हे नियम पाळा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु