‘या’ कारणांमुळे खराब होतात ‘किडन्या’

‘या’ कारणांमुळे खराब होतात ‘किडन्या’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम- आधुनिक जीवनशैलीमध्ये किडनीच्या समस्या लोकांमध्ये जलद वाढत आहे. किडन्या जर योग्य प्रकारे काम करत नसेल तर किडनी फ्येल्योरची शक्यता खुप कमी असते. शरीराच्या रक्ताचा महत्त्वाचा भाग किडनी जवळून जात असतो. किडनीमधील लोखो नेफ्रोन नलिका रक्त शुध्द करतात. हे रक्ताच्या अशुध्द भागाला मूत्राच्या रुपातून बाहेर काढतात. किडनीचे रोग सुरुवातीला समजत नाही परंतु हे हाणीकारक असतात. असे झाले तर नंतर किडनी फेल्योरचा धोका असतो.

किडन्या खराब होण्याची कारणे खालीलप्रमाणे :

१) प्रोटिन्स:

आहारात अधिक प्रमाणात प्रोटिन्स घेतल्याने कालांतराने किडनीचे आजार होतात. कारण प्रोटीन मेटाबोलिसम झाल्यानंतर ब्लड युरिया नायट्रोजन नावाचा टाकाऊ पदार्थ तयार होतो. जो गाळून वेगळा करण्याचे कार्य किडनीचे असते. आणि हा टाकाऊ पदार्थ अधिक प्रमाणात तयार झाला तर किडनीवर अतिरिक्त कामाचा भार येतो. त्यामुळे किडन्या खराब होतात.

२) पेनकिलर्स :

आपण सगळेच जाणतो की अती पेनकिलर्स घेण्याने किडनीवर परिणाम होतो. कारण ही औषधे किडनीकडून उत्सर्जित झाल्यावर त्याचे विघटन करण्याचे कार्य यकृताचे असते. आणि मग ते पचन नलिकेत सोडले जाते. अती प्रमाणात पेनकिलर्स घेतल्याने किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. आणि किडन्या खराब होतात.

३) इन्फेकशनमुळे :

इन्फेशनमुळे होणाऱ्या आजारांचे स्वरूप सौम्य पासून गंभीर होत जाते. आणि त्याचा शरीरावर कोणत्यातरी प्रकारे परिणाम होतो. व्हायरल इन्फेकशनमुळे मलेरिया, लेप्टोपिरॉसिस, डेंग्यू असे आजार झाल्यास त्याचा परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे आपल्या किडन्या खराब होतात.

४) रक्तदाब:

तुम्हाला जर उच्च रक्तदाबासोबत मधुमेहाचा त्रास असले तर तुमच्या किडनीचे आरोग्य धोक्यात आहे. उच्च रक्तदाबामुळे किडनीजवळील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे किडनीला कार्य कारणासाठी पुरेशा रक्ताचा पुरवठा होत नाही. अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे किडनीला ऑक्सिजनचा व पौष्टीक घटकांचा कमी पुरवठा होतो. आणि किडन्या निकामी होता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु