पुण्यात रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे काढला किडनीतील ट्यूमर

पुण्यात रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे काढला किडनीतील ट्यूमर

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये एका पंचावन्न वर्षांच्या व्यक्तीच्या किडनीमधील ट्यूमर डॉक्टरांनी रोबोटिक सर्जरीद्वारे काढून टाकला. या व्यक्तीच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्याने त्याने विविध उपचार केले परंतु, काहीच उपयोग झाला नाही. सोनोग्राफी केल्यानंतर त्याच्या किडनीमध्ये गाठ असल्याचे आढळून आले. आता किडनी गमवावी लागणार, कॅन्सर असेल का, या भितीने हा रूग्ण ग्रासला होता. परंतु, रूबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे हा ट्यूमर काढून टाकला.

विविध उपचार करूनही वेदना थांबत नसल्याने या रुग्णाला डॉक्टरांनी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. रूबी हॉलमध्ये या व्यक्तीच्या किडनीत असलेला ट्युमर जीवघेणा नसल्याचे मात्र तो काढणे आव्हानत्मक असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. किडनीच्या आत ट्युमर असण्याची अशी प्रकरणे दुर्मिळ म्हणजे २० टक्केच असतात. हा ट्यूमर काढणे म्हणजे डॉक्टरांसाठी आव्हानच असते. किडनीच्या पृष्ठभागावर असलेल्या ट्युमरप्रमाणे किडनीच्या आत असलेल्या ट्युमरची जागा समजत नाही. शस्त्रक्रिया करून असा ट्युमर काढणे हे तांत्रिकदृष्ट्या खूप गुंतागुंतीचे असते. किडनीत ट्युमर असल्यास २ पर्याय असतात. शस्त्रक्रियेने ट्युमर काढणे किंवा किडनी काढून टाकणे हे ते दोन पर्याय होय. मात्र या रुग्णाची किडनी चांगली असल्याने किडनी काढण्याचा पर्याय डॉक्टरांना योग्य वाटला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले.

किडनीच्या आतील हा ट्युमर शोधणे खूपच अवघड काम असते. अल्टड्ढासाऊंडमुळे ट्युमरचा आकार, जागा समजण्यास मदत होते. तसेच ट्युमरजवळील रक्तवाहिन्यादेखील समजून येत असल्याने येथील डॉक्टरांनी अल्टड्ढासाऊंड प्रोबचा वापर करून ट्युमर काढला. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन तास लागले. ट्युमरचा आकार ४ सेमी होता. शस्त्रक्रियेनंतरच्या तपासणीत ट्युमर पूर्णपणे निघाला असल्यास दिसून आले. शस्त्रक्रियेनंतर ३ दिवसातच रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु