विविध आजारांना दूर ठेवतो ‘हा’ चहा, नियमित घेतल्याने होतील ‘हे’ १० फायदे

विविध आजारांना दूर ठेवतो ‘हा’ चहा, नियमित घेतल्याने होतील ‘हे’ १० फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : जास्त प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे दिवसभरात दोन कपपेक्षा जास्त चहा पिऊ नये असे तज्ज्ञ सांगतात. परंतु, तुम्हाला लेमन टी पिण्यास काहीच हरकत नाही. कारण, लेमन टी नियमित प्यायल्याने आरोग्य चांगले राहते. लेमन टी प्यायल्याने कोणकोणते फायदे होतात, हे जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे
१ लेमन टी मुळे पचनसंस्था निरोगी राहते. शरीरात उर्जा निर्माण होते. दिवसभर तजेलदार दिसू शकता.

२ दिवसातून ३-४ वेळा लेमन टी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. कोलेस्टरॉल कमी होते.

३ यातील व्हिटॅमिन सीमुळे मुरूमे आणि काळे डाग कमी होतात. यात मध आणि साखर टाकून घेतल्यास चेहरा तजेलदार दिसतो.

४ सकाळी उठल्यावर व्यायाम करण्याआधी लेमन टी प्यायल्याने वजन कमी होते. भुकेही नियंत्रित राहते.

५ पचनसंस्थेचे शुद्धीकरण होते. टॉक्सिन्स शरीराबाहेर पडतात. पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत.

६ यात आले टाकून दिवसातून ३-४ वेळा घेतल्यास सर्दी बरी होते.

७ घशाची खवखव, खोकला बरा होतो.

८ मध टाकून घेतल्यास श्वसनाचे आजार होत नाहीत.

९ पोट साफ राहते.

१० ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी, थकवा, सुस्ती नाहीशी होते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु