जस्ट रिलॅक्स ! स्तनात असणाऱ्या सर्वच गाठी कॅन्सरच्या नसतात ; जाणून घ्या

जस्ट रिलॅक्स ! स्तनात असणाऱ्या सर्वच गाठी कॅन्सरच्या नसतात ; जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम – सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनके महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरबद्दल  खूप मोठी भीती आहे. त्यांच्या स्तनात जर कुठे थोडी गाठ निर्माण झाली तरी त्यांना कॅन्सरची होण्याची खूप भीती असते. पण तुम्हाला टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. कारण महिलांच्या स्तनात निर्माण होणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. त्यामुळे खालील माहितीच्या आधारे जाणून घ्या स्तनातील कॅन्सरच्या गाठीच्या  समज आणि गैरसमजाबद्दल.

स्तनात होणारे बदल हे प्रामुख्याने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमुळे होतात. या बदलांच्या वेळी स्तनात गाठीही तयार होतात. कधी कधी या गाठी वितळतात. तर काही वेळा त्या तशाच राहतात. यामुळे स्तनात गाठ आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. कारण गाठ नक्की कसली आहे हे कळल्याशिवाय उपचार करता येत नाहीत.

स्तनात ४ प्रकारच्या गाठी आढळतात. फायब्रोएडिनोमा ही एक बेनाईन गाठ आहे. ही गाठ प्रामुख्याने तरुणींमध्ये आढळते. स्तनामधील सिस्ट या गाठी बेनाईन द्रवाने भरलेल्या असतात. फायब्रोसिस्टीक यात देखील ब्रेनाईन द्रव असते. या गाठी प्रामुख्याने प्रौढ महिलांच्या स्तनात आढळतात. त्यात फायबर स्ट्रोकही असतो.

आणि चौथी गाठ ही कॅन्सरची गाठ असते. इतर गाठींच्या तुलनेत ही गाठ सर्वात कडक असते. ही गाठ शरीरात वाढत असताना वेदना होत नाहीत. यामुळे बऱ्याचवेळा कॅन्सर झाल्याचे उशीरा कळते. यामुळे महिलांनी स्वत:च स्तनांची तपासणी करावी. यासाठी रोज स्तनांचे निरिक्षण करावे. यात जर काही बदल जाणवला तर डॉक्टरांकडे जा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु